पहिले पान | महामुंबई | पहिल्याच दिवशी 5291 अर्जाची विक्री

पहिल्याच दिवशी 5291 अर्जाची विक्री

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

गिरणी कामगारांच्या घरांसाठी म्हाडाकडून सोमवारी पहिल्याच दिवशी 5291 अर्जाची विक्री झाली तर 15 कामगारांनी माहिती भरून अर्जही जमा केले.

मुंबई- गिरणी कामगारांच्या घरांसाठी म्हाडाकडून सोमवारी पहिल्याच दिवशी 5291 अर्जाची विक्री झाली तर 15 कामगारांनी माहिती भरून अर्जही जमा केले. अर्जाचे शुल्क 50 रुपये असून, अर्जाला कोणतीही कागदपत्रे जोडून नयेत, अशी सूचना आहे. मुंबईतील सारस्वत बँकेच्या निवडक 15 शाखांमध्ये अर्ज विक्रीसाठी ठेवण्यात आले असून, सात हजार घरांसाठी दोन लाख अर्ज म्हाडाने उपलब्ध करून दिले आहेत. 14 ऑक्टोबपर्यंत अर्जाची विक्री व 15 ऑक्टोबरपर्यत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

अर्जामध्ये फक्त अर्जदार गिरणी कामगारच असला पाहिजे, अशी अट असल्याने हयात नसलेल्या गिरणी कामगारांच्या नातेवाईकांनी अर्ज भरायचे की नाही हाही प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय अर्जात चुकीची माहिती आढल्यास अर्ज रद्द ठरवला जाणार असल्याने कामगारांनी संताप व्यक्त केला आहे.

अर्ज विक्री थांबवण्यासाठी कामगारांची निदर्शने

अर्जातील माहिती ही म्हाडाच्या आजपर्यंतच्या अर्जाप्रमाणे असल्याने हे गिरणी कामगारांवर अन्याय करणारे फसवे आहे. अशा प्रकारचे जाचक अटी व फसवे अर्ज विकण्याचे काम सारस्वत बँकेने थांबवावे, या मागणीसाठी गिरणी कामगार निवारा व कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली सोमवारी कामगारांनी लोअर परेळ व बोरिवलीच्या सारस्वत बँकेवर निदर्शने केली.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0