पहिले पान | महामुंबई | सारे काही श्रेयासाठी

सारे काही श्रेयासाठी

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता कधीही जाहीर होण्याची शक्यता असल्याने सॅटीस प्रकल्पाचे उद्घाटन सात सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते घाई घाईत करण्याचा घाट सत्ताधा-यांनी आखला आहे.

कल्याण: कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीची आचारसंहिता कधीही जाहीर होण्याची शक्यता असल्याने सॅटीस प्रकल्पाचे उद्घाटन सात सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते घाई घाईत करण्याचा घाट सत्ताधा-यांनी आखला आहे. एमएमआरडीएच्या अनुदानातून हा प्रकल्प साकारला असल्याने, मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना या कार्यक्रमास न बोलावता सत्ताधारी राजशिष्टाचाराचा भंग करीत असल्याने उद्घाटनावर बहिष्कार घालण्याचे काँग्रेसने ठरवले आहे, अशी माहिती केडीएमसीचे विरोधी पक्षनेते सचिन पोटे यांनी दिली.

पश्चिमेतील  रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी सुमारे 84 कोटी रुपये खर्च करून एमएमआरडीएच्या अनुदानातून सॅटीस प्रकल्प उभा राहात आहे. सॅटीसच्या कासव गतीच्या कामामुळे कल्याणकरांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे.

31 जुलै रोजी सॅटीसच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते मात्र तब्बल एक वर्षानंतर पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होत आहे. सॅटीसच्या कामामुळे प्रवाशांना तारेवरची क सरत करावी लागत असल्याने महिनाभरापूर्वीच कल्याणकरांनी स्वत:हून स्कायवॉक खुला केला आहे. नागरिकांनी या सॅटीसचे यापूर्वीच उद्घाटन केले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर श्रेय घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांची धावपळ सुरू असल्याची टीका पोटे यांनी केली. मात्र महापौर रमेश जाधव यांनी मुख्यमंत्र्याना आमंत्रित केले असल्याचे सांगितले.

 

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0