नव्या वर्षात कल्याण-डोंबिवली कचरामुक्त!
कल्याण-डोंबिवलीतील कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी आधुनिक पद्धतीचा आराखडा केडीएमसीने तयार केला आहे. जानेवारीत प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे. त्यामुळे कचरामुक्त शहर हीच कल्याण-डोंबिवलीकरांसाठी नववर्षाची भेट ठरणार आहे.
डोंबिवली- कचरा ही जगातील सर्वच शहरांची सर्वात मोठी समस्या आहे. ती कायमची निकालात काढण्यासाठी राज्याच्या सुवर्ण नगरोत्थान महाअभियानांतर्गत 43 कोटी 75 लाख रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यात कल्याण-डोंबिवलीतील कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी आधुनिक पद्धतीचा आराखडा केडीएमसीने तयार केला आहे. जानेवारीत प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे. त्यामुळे कचरामुक्त शहर हीच कल्याण-डोंबिवलीकरांसाठी नववर्षाची भेट ठरणार आहे.
महापालिका क्षेत्रातदररोज 550 मेट्रिक टन कचरा गोळा होतो. हा सर्व कचरा कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात येतो. त्याची क्षमता संपली असूनही गेल्या अनेक वर्षापासून तेथे कचरा टाकला जात आहे. त्यामुळे प्रदूषण आणि दुर्गंधीचा त्रास कल्याणकरांना सहन करावा लागत आहे. या प्रकल्पांतर्गत राज्य सरकारला पालिकेकडून 50 टक्के अनुदान आणि 50 टक्के कर्ज मिळणार आहे. यात कचऱ्याची दोन भागांत विभागणी करण्यात येईल. कचरा गोळा करून वाहतूक करणं व कच-याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणं, असे हे टप्पे असतील. या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून दहा कोटींचं अनुदान मिळालं आहे. त्यात प्रत्येक वॉर्डासाठी एक मिनी टिपर अशा एकूण 70 गाडय़ा, 10 डंपर प्लेसर, 22 मिनी कॉम्पॅक्टर, एक वॉशिंग टँकर, कचरा उचलण्याच्या 22 गाडय़ा अशा कचरा वाहून नेणाऱ्या एकूण 125 नवीन गाडय़ा महापालिकेत दाखल होणार आहेत. याशिवाय सोसायटी व मार्केट परिसरात 94 ठिकाणी मिळून दीड हजार कचरापेट्या ठेवण्यात येणार आहेत. प्रत्येक वाहनाला व्हेइकल ट्रॅकिंग लावण्यात येणार आहे. ग्लोबल पोझिशन सिस्टमचाही (जीपीएस) वापर करण्यात येईल. त्यामुळे वाहन नेमकं कुठे आहे आणि प्रत्येक परिसरातील कचराकुंडय़ांची स्थिती काय आहे, याची माहिती मिळणार आहे. त्यामुळे 1991 पासून पालिकेच्या सेवेत असलेल्या सर्व जुन्या गाडय़ा बंद करण्यात येणार आहेत. आधुनिक पद्धतीने कच-याची विल्हेवाट लावण्याचा आराखडा तयार करण्यात आला असून त्याचं कंत्राट ‘अॅन्थोनी’ला देण्यात आलं आहे. साधारण तीन महिन्यांत नवीन गाड्या पालिकेला मिळणार असल्याचं घनकचरा विभागाचे उपायुक्त संजय घरत यांनी सांगितलं. कचरा गोळा केल्यानंतर कच-याने भरलेल्या सर्वच गाडय़ा आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवर जातात. मात्र या प्रक्रि येत पूर्ण क्षमतेचा वापर असलेली एकच गाडी डम्पिंगवर जाईल.
त्यामुळे प्रदूषण, वाहतूक कोंडी आदी समस्या उद्भवणार नाहीत, असंही त्यांनी सांगितलं. कच-याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावताना त्यापासून खत निर्मिती करण्यात येणार आहे. गोराईच्या धर्तीवर हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. येत्या जानेवारीत दोन ते तीन वॉर्डात ही प्रक्रिया सुरू करण्याचा पालिकेचा मानस असल्याचं घरत यांनी सांगितलं.




Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा