पहिले पान | महामुंबई | बोच-या थंडीमुळे मुंबईकर काकडले

बोच-या थंडीमुळे मुंबईकर काकडले

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

जानेवारीत 10 अंश सेल्सिअस तापमानाचा रेकॉर्ड केल्यानंतर मुंबईतून गायब झालेल्या थंडीने पुनरागमन करत पुन्हा एकदा पारा 8.8 अंश सेल्सिअस इतका खाली उतरला आहे.

मुंबई-  मुंबई 8.8, पुणे 4.6, नाशिक 2.7 आणि निफाड तर चक्क 0.2 अंश सेल्सिअस! मुंबईसह राज्यात गुरुवारी दोन वर्षातील निचांकी तापमान नोंदवले गेले. बोचरी थंडी आणि वेगाने वाहणारे वारे यामुळे सकाळी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांनी हुडहुडी भरत होती. थंडीमुळे अनेक ठिकाणी धुके दाटले होते. दोन दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.
 

उत्तर भारतात कोसळणा-या मुसळधार पावसामुळे आणि प्रचंड बर्फवृष्टीमुळे राज्यभर थंडीची लाट पसरली आहे. गुरुवारी पहाटे सांताक्रुझ वेधशाळेने किमान 8.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली, तर कुलाबा वेधशाळेत 14.2 अंश किमान तापमानाची नोंद केली. मुंबईत नोंदवले गेलेले हे दहा वर्षांतील दुस-या क्रमांकाचे किमान तापमान आहे. आठ फेब्रुवारी 2008  रोजी मुंबईत 8.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

 मुंबईसह कोकण किनारपट्टीत हवेच्या दाबात फरक पडल्याने ताशी 20 किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे पुढील 24 तासांत मच्छीमारांनी सुमद्रात जाऊ नये, असा इशारा वेधशाळेने दिला आहे. वा-याचा वेग वाढला असला तरी चक्रीवादळासारख्या आपत्तींचा धोका मुंबईकरांना नसल्याचा दावा कुलाबा वेधशाळेतील अधिका-यांनी केला आहे. थंडीमुळे धुके दाटल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता.

नाशिक गारठले

  

कडाक्याच्या थंडीने नाशिक जिल्हा गारठला असून निफाडमध्ये तापमान शून्यापर्यंत पोहोचले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी द्राक्षांच्या बागेत दवबिंदू गोठले होते. राहुरी विद्यापीठाच्या गहू संशोधन केंद्रातील वेधशाळेत 0.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आल्याची माहिती संस्थेचे निरीक्षक राजेंद्र बेलदार यांनी दिली. या थंडीमुळे गहू व द्राक्ष उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात जळगाव (10), अहमदनगर (12), नाशिक (2.7), पुणे (4.6), शहादा (4.4) येथे कमी तापमानाची नोंद झाली.

देशही थंडीने गारठला...

दिल्लीतील किमान तापमान काल रात्री केवळ 4 सेल्सिअस होते. गेल्या पाच वर्षातील हे नीचांकी तापमान आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2008 मध्ये दिल्लीतील नीचांकी तापमान 8.8 सेल्सिअस होते. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बुधवारी रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस आणि प्रचंड हिमवृष्टी झाली. त्यामुळे तेथील तापमानात प्रचंड घट झाली आहे. सिमला येथे जवळपास 60 सेंटिमीटर हिमवृष्टी झाल्याचे वृत्त आहे. तेथील किमान तापमान उणे 3.8 सेल्सिअस नोंदवण्यात आले.
हिमवृष्टी सुरू असल्याने मनालीतही पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत. मात्र ठिकठिकाणी बर्फ साचल्याने वाहतूक खोळंबली आहे. गढवाल आणि कुमाऊन येथील उंच भागामध्ये हिमवृष्टी झाली आहे. डेहराडून-यमनोत्री आणि ऋषिकेष-गंगोत्री यात्रेचा मार्ग हिमवृष्टीमुळे बंद झाला आहे.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0