पहिले पान | महामुंबई | पालघरजवळ टेम्पो अपघात;सहा ठार

पालघरजवळ टेम्पो अपघात;सहा ठार

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

लग्नसमारंभ आटोपून परतणारा व-हाडाचा ट्रक वांद्री नदीच्या पुलावरून कोसळून झालेल्या अपघातात सहाजण ठार झाले.

पालघर- हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी परत येत असलेल्या टेम्पो चालकाचा  ताबा सुटल्याने टेम्पो 25 फुट खाली पुलात पडल्याने 6 जण ठार झाले.  हा अपघात मनोर गावाजवळ बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास झाला. वाहन चालक गंभीर जखमी झाला असून अन्य 11 जण किरकोळ जखमी झाल़े मृतांमध्ये 3  लहान मुलांचा समावेश आहे. या प्रकरणाची मनोर पोलिसांनी गुन्हा नोंदला आह़े

 

बुधवारी पहाटे तीन वाजता सुमारास (मनोर जवळील) हलोली बोट येथे राहणारे 22 जण विरार  येथील हळदीचा कार्यक्रम आटोपून टेम्पोने परत गावाकडे येत होते. त्यांचा टेम्पो वरई नाक्याजवळील पुलावर आला असता चालक सुदाम भोईरचा ताबा सुटला आणि गाडी वांद्री नदीत 25 फूट खोल पडला. या अपघातामध्ये सहा जण ठार झाले. मृतांमध्ये जान्हवी सुदाम भोईर (तीन), अंकीता शिणवार भोईर (चार), अतल अनंता भोईर (सहा), हर्षला मनोहर भोईर (17), सुधा सुदाम भोईर (35) आणि दयानंद दत्तू भोईर यांचा समावेश आहे.

 टेम्पो चालक सुदाम भोईर हा गंभीर जखमी झाला़ त्याला बोरिवली येथील भगवती रुग्णालयात दाखल केल़े 11 जणांना किरकोळ मार लागल्याने जवळच्या रुग्णालयात प्रथोमचार करुन सोडून दिले.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0