अमिताभ बच्चन यांच्यावर शनिवारी शस्त्रक्रिया
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चनयांच्यावर शनिवारी शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती बिग बी यांनी आपल्या ब्लॉगवर दिली आहे.
मुंबई- ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चनयांच्यावर शनिवारी शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती बिग बी यांनी आपल्या ब्लॉगवर दिली आहे. मात्र ही शस्त्रक्रिया कोणत्या रुग्णालयात होणार आहे याची माहिती मात्र त्यांनी असल्याची माहिती त्यांनी आपल्या ब्लॉगवर दिलेली नाही.
अमिताभ बच्चन यांना गेल्या काही दिवसांपासून पोटदुखीचा त्रास होत आहे. ' बुधवारी पोटाचा सीटी स्कॅन केल्यानंतर, डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. आज रुग्णालयात माझ्या पोटावर काही उपचार करण्यात आले असून, त्याची माहिती कुटुंबियांना देणार आहे. शनिवारी एक छोटी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी माझे कुटुंबिय माझ्या सोबत असणार आहेत. माझ्या प्रकृतीबाबत आणखी तपशील देत नाही कारण ही शस्त्रक्रिया फारशी गंभीर नाही. या शस्त्रक्रियेसाठी मला आजपासूनच इंजेक्शन्स देण्यात येत आहेत. शस्त्रक्रियेनंतरही काही दिवस इंजेक्शन दिली जाणार असल्याने मी काही दिवस रुग्णालयातच असेन. मात्र मी ब्लॉग किंवा ट्विटरच्या माध्यमातून तुमच्या संपर्कात राहीन.' असे अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवर म्हटले आहे.
अमिताभ बच्चन यांनी अभिनित केलेल्या 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या कुली या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी झालेल्या अपघातामध्ये मोठा अपघात झाला होता. त्यावेळी त्यांच्या पोटाला दुखापत झाली होती. त्यावेळी ते बरेच महिने रुग्णालयात होते. त्यानंतर 2005 मध्ये पुन्हा पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालात त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली होती.' व्यस्त दिनक्रम, रात्री उशीरापर्यंत केलेले जागरण यामुळे पोटदुखीचा त्रास बरा झाला नाही. त्यामुळे या पोटदुखीच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी जागरणं टाळण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. पण सतत चालणारी चित्रीकरणामुळे हे करण जमलं नाही त्याचाच आता मला त्रास होत आहे.आता मात्र या पोटदुखीपासून मला आराम हवा आहे. पोटदुखीच्या वेदना असूनही काम करण्याची शक्ती मला परमेश्वराने दिली या बद्दल मी परमेश्वराचा ऋणी आहे. माझे चाहत्यांच्या प्रेमामुळेच मला काम करण्यास ऊर्जा मिळते.' असे ही त्यांनी नमूद केले आहे.





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा