PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: महामुंबई मध्य वैतरणाचे पाणी पेटणार? ================================================================================ प्रहार वार्ताहर on 23 May, 2012 03:15:00 AM मोखाडा तालुक्यात मध्य वैतरणा धरणाचे काम पुर्णत्वास येऊ लागताच धरणाचे पाणी येथील जनतेला द्यावे की मुंबईकरांना यासाठी आमदार चिंतामण वनगा व महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्यामध्ये संघर्षाची ठिणगी पेटली आहे. तेल गळतीच्या उपायासंदर्भात समिती स्थापन ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 22 May, 2012 02:35:00 AM केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्यातर्फे एका विशेष समिती स्थापन करण्यात आली असुन तेल गळती झालेला भाग जैवविविधतेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असल्यास तेथे फवारणी करताना कोणती काळजी घ्यायची याबाबतची तत्वे समिती ठरवणार आहे. आरोपींना दोन जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी ================================================================================ प्रहार वार्ताहर on 23 May, 2012 02:45:00 AM दिवेआगर येथील सुवर्णगणेश चोरी प्रकरणातील पाच आरोपींना न्यायालयाने दोन जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी वाढवून दिली तर एका आरोपीला दोन जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. कर्जत बाजारपेठेतील रस्ते धुळीत ================================================================================ प्रहार वार्ताहर on 23 May, 2012 01:45:00 AM कर्जत तालुक्याच्या दोन्ही बाजारपेठेतील रस्ता रुंदीकरणाच्या केलेल्या कामामुळे सिमेंट व मातीमुळे धुळीत भर पडत आहे.त्यामुळे येथील रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. व्हॅलिक्रॉसिंग रोपमुळे माथेरानमध्ये झाडांचा बळी ================================================================================ प्रहार वार्ताहर on 23 May, 2012 02:05:00 AM माथेरान येथाल ‘लुईजा पॉइंट’ परिसरात झाडांना दोर बांधून सुरू असलेल्या व्हॅलिक्रॉसिंगमुळे या भागातील अनेक झाडांची हानी होत आहे, सोबतच अनेक झाडे कोलमडून जात आहेत. योजनेतील कामाच्या वादात ग्रामस्थांच्या घशाला कोरड ================================================================================ संतोष पेरणे on 23 May, 2012 01:55:00 AM नेरळजवळील दामत-भडवळ येथील भारत योजनेंतर्गत सुरू करण्यात आलेली नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी दोन पाणी समित्या स्थापन झाल्यामुळे योजनेचे काम दोन वर्षापासून रखडले आहे. जेएनपीटी बंदरातील रसायनांमुळे मासेमारीवर परिणाम? ================================================================================ प्रहार वार्ताहर on 23 May, 2012 01:35:00 AM उरण येथील जेएनपीटी बंदर परिसरात टँकफार्ममधून रसायनांना गळती लागुन रसायने काही प्रमाणात गटारातून वाहत जात समुद्रात जातात. त्यामुळे किना-यावरील मासेमारीवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे रेव्ह पार्टीसाठी फेसबुकवरून निमंत्रणे ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 22 May, 2012 10:30:00 AM जुहू येथील ओकवुड हॉटेलमध्ये झालेल्या रेव्ह पार्टीची निमंत्रणे फेसबुकच्या माध्यमातून देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंब्य्रात आता सकाळी भारनियमन ================================================================================ प्रहार वार्ताहर on 22 May, 2012 01:45:00 PM रात्री सुरू असलेले मुंब्य्रातील भारनियमन आता दिवसा करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. पूर्वीच्या वेळा बदलल्या असल्या तरी सात तासांचे भारनियमन कायम आहे. ‘श्रीरंग’च्या 18 इमारती धोकादायक! ================================================================================ प्रहार वार्ताहर on 22 May, 2012 01:38:00 PM शहरातील मोठी आणि जुनी नागरी वसाहत असलेल्या श्रीरंग-वृदांवन सोसायटीला पुनर्विकासाच्या पडद्याआडून विकासक मंडळींनी वेढले आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला हाताशी धरत श्रीरंग सोसायटीतील 18 इमारती धोकादायक असल्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेकांनी यात काळेबेरे असल्याचा संशय व्यक्त केला आहे.