PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: महामुंबई ‘कोकण महोत्सवा’ला लोकांचा चांगला प्रतिसाद ================================================================================ प्रहार वार्ताहर on 22 May, 2012 01:13:00 PM सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ पनवेल व लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या वतीने नवीन पनवेल सेक्टर 2 येथे 14 ते 24 मे 2012 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या भव्य कोकण महोत्सवाला पनवेल, नवीन पनवेल आणि परिसरातील नागरिकांचा रोजच वाढता प्रतिसाद मिळत आहे. अतिधोकादायक इमारतींची संख्या घटती ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 22 May, 2012 12:51:00 PM यंदा अतिधोकादायक इमारतींच्या यादीत फक्त आठ इमारती असल्याचे म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने जाहीर केले आहे. दहा वर्षांत फक्त 3,874 इमारतींत जलसंचय! ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 22 May, 2012 12:43:00 PM मुंबईतील पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी नव्याने बांधकाम करण्यात येणा-या इमारतींमध्ये वर्षा जलसंचयन (रेन वॉटर हार्वेस्टिंग) योजना राबवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. पण आजघडीला ही योजना अमलात येवून दहा वर्षे उलटूनही प्रत्यक्षात 6,835 इमारतींपैकी केवळ 3,874 इमारतीमध्येच ही योजना राबवण्यात आली. मुंबई महापालिकेतही बदल्यांचे वारे? ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 22 May, 2012 12:36:00 PM मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सीताराम कुंटे यांनी विभाग कार्यालयांतील सहाय्यक आयुक्त व उपायुक्तांच्या बदल्या करून अधिका-यांमधील मरगळ दूर करण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवले आहे. जमिनीची किंमत कमी करण्यात आली ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 22 May, 2012 12:31:00 PM आदर्श सोसायटीला जमीन देण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्य सरकारच्या अर्थखात्याने निश्चित केलेली व मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेली 10 कोटींची किंमत अचानक कमी करण्यात आली, अशी धक्कादायक माहिती माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर-पाटील यांनी आदर्श सोसायटी चौकशी आयोगासमोर दिली. 1995 मधील झोपड्या तोडणा-यांविरोधात आवाज उठवणार ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 22 May, 2012 01:43:00 PM ऐरोलीतील 1995 मधील झोपड्या पाडण्यासाठी सत्ताधारी सरावले आहेत. स्थानिक नगरसेवकांकडून या झोपडय़ा पाडल्या जात असून, नगरसेवकांच्या मनमानीविरोधात स्वाभिमान संघटना आवाज उठवेल, अशी ग्वाही स्वाभिमान संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष नितेश राणे यांनी रविवारी ऐरोली येथे दिली. ‘राज्यातील सर्व मराठी शाळांना तात्काळ मान्यता द्या’ ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 22 May, 2012 12:30:00 PM राज्यात 2005 पासून सुरू असलेल्या मराठी शाळांना राज्य सरकारने तात्काळ मान्यता द्यावी, त्याकरता कोणत्याही कायदेशीर अटी लावू नये, अशी मागणी शिक्षण हक्क समन्वय समिती व मराठी अभ्यास केंद्रातर्फे करण्यात आली आहे. आता कोकेनच्याही कॅप्सुल उपलब्ध ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 22 May, 2012 12:20:00 PM कोकेनची खरेदी-विक्री ग्रॅममध्ये केली जात असल्यामुळे अनावश्यक कोकेन वाया जात होते. तसेच, एक ग्रॅम कोकेन सापडल्यास शिक्षा कठोर असल्यामुळे सांभाळण्याचीही जोखीम मोठी असे. त्यामुळे कमी प्रमाण असलेल्या कोकेनच्या कॅप्सुल तयार करण्याचा पर्याय आला असून त्याची मागणीही वाढत असल्याचे वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले. ‘स्वदेशी’च्या कामगारांना थकित देणी? ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 22 May, 2012 12:18:00 PM राष्ट्रीय मिल मजदूर संघाने स्वदेशी मिलच्या कामगारांना कायद्यानुसार देणी मिळण्याबाबत सादर केलेल्या योजनेवर येत्या नऊ जुलै रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे. पोलिस, रहिवाशांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू ================================================================================ प्रहार वार्ताहर on 22 May, 2012 12:16:00 PM लुटमारीची तक्रार देण्यास कल्याणमधील नेतिवली येथील पोलिस चौकीमध्ये गेलेल्या दिनेश दुबे या तरुणास मनोरुग्ण समजून पोलिस आणि स्थानिक रहिवाशांनी अमानुष मारहाण केली यात त्याचा मृत्यू झाला.