06 February, 2012 10:45:00 AM
मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात अनेक नातेवाईक एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असून त्यामुळे नाते गोत्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
06 February, 2012 10:40:00 AM
शिवसेनेकडून सोमवारी करण्यात येणा-या मलंगमुक्ती आंदोलनाच्या जाहिरातीतून खुद्द महापौरांनाच वगळण्यात आल्याने केडीएमसी शिवसेनेतील वाद पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे....
06 February, 2012 10:24:00 AM
तब्बल सहा तास खपून चर्चगेट ते विरारपर्यंतचा संपूर्ण मार्ग ‘एसी’ प्रवाही करुन पश्चिम रेल्वेने हाती घेतलेला एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प रविवारी पूर्ण केला....
05 February, 2012 11:30:00 PM
रविवारीच्या महाजम्बोब्लॉकनंतर रात्रीच दादर रेल्वे स्थानकाजवळ ओव्हर हेड वायर तुटल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. ...
05 February, 2012 09:30:00 PM
काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि मनसेसह विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमी धडाक्यात प्रचाराला सुरुवात केली आहे. ...
05 February, 2012 08:35:00 PM
अंधेरी ते चर्चगेट एवढ्या मोठ्या मार्गावर सकाळी साडेदहा ते संध्याकाळी साडेचार या काळात अप आणि डाउन दिशेने एकही गाडी न चालवण्यामुळे अंधेरी रेल्वे स्थानकाच्या बाहेर प्रवाशांचा समुद्र उसळला होता....
05 February, 2012 08:30:00 PM
लोकसभा, विधानसभा तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराची ओळख पटवण्यासाठी शिधापत्रिकेचा वापर करण्यास केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. ...
05 February, 2012 08:25:00 PM
क्रॉर्फड मार्केटमध्ये शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमाराला लागलेल्या आगीत कापड, फळ तसेच कोंबडी विक्रेत्यांची दुकाने जळल्याची घटना घडली. ...
06 February, 2012 02:30:00 AM
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांनी 2009 मध्ये व्हीजेटीआयला भेट दिली होती. त्यावेळी ‘तंत्रज्ञान दृष्टी-2020’ या विषयावर बोलताना त्यांनी देशाच्या विकासासाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी ‘प्रतिज्ञा’ हा उपक्रम सुरू केला. या त्याअंतर्गत व्हीजेटीआयचे विद्यार्थी मुंबई व उपनगरांतील माध्यमिक शाळांत जाऊन सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना रोबो बनवण्याचे प्रशिक्षण देतात. त्यासाठीचे साहित्य व्हीजेटीआयमार्फतच पुरवले जाते. गेल्या वर्षी या विद्यार्थ्यांनी काही खासगी शाळांमध्ये रोबो निर्मितीची प्रात्यक्षिके दाखवली होती. यंदा महापालिका शाळांमध्ये तसेच काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने रस्त्यांवर राहणा-या मुलांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याशिवाय येत्या 11 आणि 12 फेब्रुवारीलादेखील व्हीजेटीआयमध्येच कार्यशाळा घेतली जाणार आहे. या कार्यशाळेत बीएससी आयटी, बीएससी सीएस, इंजिनीअरिंग आणि एमएससीच्या विद्यार्थ्यांना भाग घेता येईल. ...
06 February, 2012 01:00:00 AM
झिप झॅप झूम करत अडथळे वेगाने पार करणा-या फॉर्म्युला वन कारचे वेड तरुणाईमध्ये भलतेच भिनलेले दिसते. या वेगवान कारची क्रेझ व्हीजेटीआयच्या ‘टेक्नोवेंझा’तही दिसून आली. ‘स्प्लिट सेकंड’ या आय. सी. इंजिन कार स्पर्धेने शनिवारी धमाल उडवून दिली....