PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: महामुंबई मेगाब्लॉक दरम्यान क्रेन कोसळून ओव्हरहेड वायर तुटली ================================================================================ प्रहार वेब टीम on 20 May, 2012 04:40:00 PM हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक दरम्यान काम चालू असताना अचानक क्रेन कोसळल्याने मानखूर्द आणि गोवंडी दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली. ठाण्याची शलाका पहिली ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 19 May, 2012 06:30:00 PM दहावीच्या परीक्षेत ठाण्यातील शलाका कुलकर्णीने देशातून संयुक्तरीत्या पहिली येण्याचा मान पटकवला. रेल्वेची नालेसफाई धीमीच ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 20 May, 2012 12:30:00 PM मुंबई महापलिकेने दोन एप्रिलपासून नालेसफाईचे काम हाती घेत 70 टक्के नालेसफाई पूर्णही झाल्याचा दावा केला आहे. तर रेल्वेने आपल्या हद्दीतील नाल्यांची सफाई तीन दिवसांपूर्वी हाती घेतली. त्यामुळे आतापर्यंत रेल्वेला केवळ 15 टक्केच नालेसफाईचे काम पूर्ण करता आले आहे. वरळीत बसवर दगडफेक ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 20 May, 2012 12:05:00 PM फेसबुकवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांची आक्षेपार्ह छायाचित्रे टाकल्याचा निषेध करण्यासाठी काही अज्ञात व्यक्तींनी शनिवारी सायंकाळी वरळी नाका परिसरात बेस्टच्या चार बसवर दगडफेक केली. फेरीवालाविरोधी कारवाईस शिवसेनेचाच विरोध ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 20 May, 2012 12:30:00 PM मुंबई महापालिकेने हाती घेतलेल्या फेरीवाल्यांवरील कारवाईलाच सत्ताधारी शिवसेनेनेच तीव्र विरोध केल्याचे चित्र आहे. ठाण्यात तीव्र पाणीटंचाई ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 20 May, 2012 10:35:00 AM राज्यातील ग्रामीण भागातील जनता पाण्यामुळे होरपळत असताना मुंबईजवळच असणा-या ठाण्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ठरल्या वेळेत गाडी न देणा-या विक्रेत्याला दणका ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 20 May, 2012 12:30:00 PM ठरलेल्या वेळेत गाडीचा ताब्यात न दिल्यामुळे, तसेच विमा आणि गाडी नोंदणी शुल्क म्हणून अतिरिक्त रक्कम आकारल्यामुळे जिल्हा ग्राहक मंचाने कार विक्रेत्याला 16 हजारांचा दंड ठोठावला आहे. परांजपे कंस्ट्रक्शनच्या विरारमधील मालमत्तेचा लिलाव ================================================================================ प्रहार वार्ताहर on 20 May, 2012 12:42:00 PM 800 सदनिका धारकांचे बुडालेले पैसे त्यांना परत मिळण्यासाठी जयंत परांजपे अ‍ॅण्ड परांजपे कन्स्ट्रक्शन कंपनीच्या विरार-कोफरड परिसरातील मालमत्तेचा 24 मे रोजी जाहीर लिलाव करण्याचे ठाणे जिल्हाधिका-यांनी जाहीर केले आहे. पनवेलमध्ये ‘मल्हार रोजगार मेळावा’ ================================================================================ प्रहार वार्ताहर on 20 May, 2012 09:30:00 AM ‘श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ’ व ‘सीकेटी महाविद्यालया’च्या वतीने रविवार, 20 मे रोजी ‘मल्हार रोजगार मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. प्रलंबित दिवाणी दाव्यांना लाभणार मुहूर्त ================================================================================ प्रहार प्रतिनिधी on 20 May, 2012 10:10:00 AM 1951 पासून प्रलंबित असलेल्या दाव्यांचा निकाल झटपट लावण्यासाठी उच्च न्यायालयाने एका विशेष गटाची नियुक्ती केली आहे.