पहिले पान | महामुंबई | 26/11 हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा हात!

26/11 हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा हात!

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानच्या लष्कराचा सहभाग होता, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने खटल्याच्या सुनावणीदरम्यान केला.

मुंबई- मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या लष्कराचा सहभाग होता, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने मंगळवारी मुंबई हल्ले खटल्याच्या सुनावणीदरम्यान केला. पाकिस्तानच्या लष्करातील मेजर जनरल दर्जाच्या अधिका-याने हल्ल्यासाठीच्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये मार्गदर्शन केल्याचा दावा विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी खटल्यातील अंतिम युक्तिवादादरम्यान केला आहे.  

मुंबईवर हल्ला करणा-या दहाही दहशतवाद्यांना लष्कर-ए-तय्यबाने शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले होते आणि या प्रशिक्षण शिबिरांना पाकिस्तानी लष्करातील वरिष्ठ अधिका-यांचे मार्गदर्शन मिळाले होते, असे निकम म्हणाले. 26/11 हल्ल्याचा कटच केवळ पाकिस्तानच्या भूमीवर रचला गेला नव्हता, तर या कटाला पाकिस्तान सरकारचा पाठिंबा होता, असा आरोपही त्यांनी केला.  

प्रशिक्षण शिबिरामध्ये एक पाकिस्तानी मेजर जनरल उपस्थित होता हे या हल्ल्यातील एकमेव जिवंत पकडला गेलेला दहशतवादी तसेच या खटल्यातील प्रमुख आरोपी अजमल कसाब यानेच कबूल केल्याचे निकम म्हणाले. हा अधिकारी पाकिस्तानी लष्करात उच्च पदावर असल्यामुळे दहशतवाद्यांसमोर त्याचे नाव उघड करण्यात आले नव्हते, हेही कसाबनेच सांगितल्याचे, त्यांनी नमूद केले.

लष्कर-ए-तय्यबा आणि पाकिस्तानी लष्कर संगनमताने काम करत असल्याचा आरोप निकम यांनी केला.

राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील आणि गृहराज्यमंत्री रमेश बागवे हे खटल्याच्या सुनावणीला उपस्थित होते.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0