पहिले पान | नैमित्तिक | प्रभाग क्रमांक- 107 घाणीमुळे डासांचे साम्राज्य

प्रभाग क्रमांक- 107 घाणीमुळे डासांचे साम्राज्य

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

सुनीलनगर प्रभागात जागोजागी पडलेला कचरा, घाण त्यामुळे परिसर बकाल झाला आहे. डासांचे साम्राज्यही दिवसेंदिवस वाढत असून रहिवाशांना डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.

कल्याण- जागोजागी पडलेला कचरा, घाण त्यामुळे परिसर बकाल झाला आहे. डासांचे साम्राज्यही दिवसेंदिवस वाढत असून रहिवाशांना डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. 

प्रभागातील आत्मसमर्थ, आत्मसृष्टी, राजकीर्ती या इमारतींसमोरून सांडपाण्याचा मोठा नाला वाहतो. त्यामुळे परिसरात दरुगधी पसरलेली असते. या नाल्याच्या एका बाजूला मोठ्या प्रमाणांत मातीचा भराव टाकून त्यावर अनधिकृत बांधकामे करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अनेक ठिकाणी कच-याचे ढीगही दिसतात. सुनीलनगर रिक्षा स्टँडच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असतो. कपिलाय को. ऑप. हौ. सोसायटीच्या परिसरांत मोठ्या प्रमाणांत पाणगवत वाढलेले आहे. रहिवाशांना या गवतातून वाट शोधावी लागते. पाणगवत वाढलेल्या जागेवर डासांचे प्रमाणही अधिक आहे. नगरसेवक पप्पू म्हात्रे यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या कामांची माहिती घेण्याकरिता अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु तो होऊ शकला नाही.  

सुनीलनगर हा प्रभाग यंदा ही अनारक्षित आहे. 2005मध्ये झालेल्या केडीएमसी निवडणुकीत या प्रभागातून पाच उमेदवार रिंगणात होते. यामध्ये भाजपचे पप्पू म्हात्रे व काँग्रेसचे डॉ. दिनेश म्हात्रे यांच्यात अटीतटीची लढत झाली. पप्पू म्हात्रे यांनी एक हजार 422 मते मिळवून विजय मिळवला. डॉ. दिनेश म्हात्रे यांना एक हजार 59 मतांवरच समाधान मानावे लागले. या प्रभागात तुकाराम नगर रस्त्याने यशोज्योती सोसायटी, मंदा बिल्डिंग, प्रगती कॉलेज, हनुमान के णे चाळ, अभिमन्यू चाळ, गावदेवी इमारत आदी परिसराचा सामावेश होतो. संध्याकाळच्या वेळेस येथे डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणांत वाढत असल्याने पालक मुलांना खेळायला सोडत नाहीत. घरातच खेळावे लागते. - ओंकार फडतरे, विद्यार्थी   

प्रभाग क्रमांक- 107 सुनीलनगर 

प्रभागाची रचना- डी. एन. सी. शाळा, हनुमान सोसायटी

लोकसंख्या- 10 हजार 466

अनुसूचित जाती- 246

अनुसूचित जमाती- 45

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0