नैमित्तिक
प्रभाग क्रमांक-10-शौचालयाची दुरवस्था, बगीचा कागदावरच!
26 August, 2010 04:05:00 AM
मोहने या परिसरावरून प्रभागाला हे नाव पडले आहे. गावातील बहुतांश भाग व मुख्य बाजारपेठ याच प्रभागाअंतर्गत येते. गेल्या अनेक वर्षांपासून महिलांसाठी बांधण्यात आलेले शौचालय भुईसपाट करण्याची करामत केडीएमसीने केली. त्यामुळे महिलांना शौचालयाचा प्रश्न सतावत आहे.
प्रभाग क्रमांक-9 रहिवाशांना प्रश्न रोजीरोटीचा
26 August, 2010 03:05:00 AM एनआरसी कंपनी असल्याने कंपनीच्याच नावाने हा प्रभाग ओळखला जातो. या वसाहतीत कामगारवर्गच मोठय़ा संख्येने राहत आहे. कंपनीला टाळेबंदी झाल्याने सुमारे चार हजार कुटुंबांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...प्रभाग क्रमांक 8- समस्यांच्या विळख्यात गाळेगाव
25 August, 2010 07:40:00 AM या प्रभागात एनआरसीची वसाहत आहे. अस्वच्छता ही या प्रभागाच्या पाचवीलाच पुजलेली आहे. जिकडे-तिकडे कचरा आणि दरुगधी पाहावयास मिळते. वसाहतीच्या मागील बाजूस असलेला कचरा कधीही साफ केला जात नसल्याने संपूर्ण वसाहत कच-याच्या विळख्यात अडकल्याचे दिसून येते. ...प्रभाग क्रमांक 7- केवळ अनागोंदी
25 August, 2010 07:55:00 AM एनआरसी कंपनी सुरू असताना कंपनीचे सफाई कर्मचारी हा परिसर स्वच्छ ठेवत. मात्र कंपनी बंद झाल्यानंतर साफसफाईचे काम बंद पडले आहे. त्यामुळे ही जबाबदारी महापालिकेवर आली आहे. मात्र पालिकेकडे तक्रार करूनही या समस्येकडे कर्मचारी व अधिकारी लक्ष देत नाहीत, अशी नाराजी स्थानिक रहिवासी व्यक्त करत आहेत....प्रभाग क्रमांक-6 - सोयी-सुविधांचा बो-या
25 August, 2010 07:30:00 AM लोकसंख्येत होणा-या वाढीच्या तुलनेत येथील सोयी-सुविधा मात्र अपु-या आहेत. त्यामुळे येथील रहिवाशांच्या समस्यांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. जिंकून आल्यावर झपाटय़ाने काम करणा-या नगरसेवकांनी आता मात्र हा प्रभाग आरक्षित झाल्यानंतर येथील समस्यांकडे दुर्लक्षच केल्याने रहिवासी चांगलेच संतापले आहेत. ...प्रभाग क्रमांक-5-मांडा झाली बजबजपुरी
24 August, 2010 12:30:00 PM मांडा हा प्रभाग यंदा अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला आहे. गेल्या निवडणुकीत या प्रभागातून चार उमेदवार रिंगणात होते. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वासुदेव पाटील व भाजपचे सुरेश भोईर यांच्यात चुरशीची लढाई झाली होती. यात वासुदेव पाटील 2,005 मतांनी विजयी झाले. सुरेश भोईर यांना 1,236 एवढी मते मिळाली तर अपक्ष चंद्रकांत केतकर यांना 192 तर बुधाराम सरनोबत यांना केवळ 33 मतेच मिळाली होती....प्रभाग क्रमांक-4 - अनधिकृत बांधकामांचे आगर अटाळी
24 August, 2010 01:00:00 PM अटाळी हा प्रभाग यंदा सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. गेल्या निवडणुकीत या प्रभागातून सहा उमेदवार रिंगणात होते. त्यात शिवसेनेचे दशरथ तरे यांनी 1,383 मतांची आघाडी घेत विजय मिळवला. त्या खालोखाल समाजवादी पक्षाचे अनल काथोड भगत यांना 663 मते मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश कोट यांना 407 तर काँग्रेसचे हरिश्चंद्र पाटील यांना 379 मते मिळाली होती...प्रभाग क्रमांक 3 - गौरीपाडा तलावाकडे प्रशासनाचे दुर्लक्षच
24 August, 2010 04:00:00 PM तलावांचे शहर म्हणूनच ओळखल्या जाणा-या कल्याण शहरातील तलावांकडे स्थानिक प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे अनेक तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत तर या प्रभागातील गौरीपाडा तलाव गेल्या अनेक वर्षापासून सुशोभीकरणाच्या प्रतीक्षेत आहे....प्रभाग क्रमांक 2- विद्यापीठाचे उपकेंद्र मुहूर्ताच्या प्रतीक्षेत
24 August, 2010 11:30:00 AM मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र याच प्रभागात साकारत असल्याने, या प्रभागाला विशेष महत्त्व आले आहे. विद्यापीठाचे भूमिपूजन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते पार पडले. त्याला तीन महिन्यांचा कालावधी लोटला असला तरी या जागेवरील साधा दगडही हललेला नाही....प्रभाग क्रमांक 1- रस्त्यांचा प्रश्न कायमच
23 August, 2010 10:35:00 AM कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. वेगाने विकास पावणा-या या शहरांत समस्यांच्या वाढीचा वेगही तितकाच जबरदस्त आहे. ‘लढाई केडीएमसीची’ या सदरातून ‘प्रहार’ने येथील समस्यांना वाचा फोडली. आता अगदी थेट प्रभागांत जाऊन तेथील समस्यांबाबत संबंधितांना ‘ऑन रेकॉर्ड’ आणणारी ‘पंचनामा प्रभागांचा’ ही नवी मालिका......मोस्ट कमेंटेड














































































































राशीभविष्य