पहिले पान | देश | वाहिन्यांवरील गुन्हे, मनोरंजनाच्या वृत्तांत घट

वाहिन्यांवरील गुन्हे, मनोरंजनाच्या वृत्तांत घट

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

देशात गेल्या काही वर्षात फुटलेल्या वृत्तवाहिन्यांच्या पेवाने या क्षेत्रात स्पर्धा सुरू झालेली असतानाच, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गुन्हेगारीविषयक तसेच मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा भडीमार होऊ लागला होता पण गेल्या वर्षभरात त्यालाही लगाम बसल्याचे दिसून आले आहे.

नवी दिल्ली- देशात गेल्या काही वर्षात फुटलेल्या वृत्तवाहिन्यांच्या पेवाने या क्षेत्रात स्पर्धा सुरू झालेली असतानाच, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गुन्हेगारीविषयक तसेच मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा भडीमार होऊ लागला होता पण गेल्या वर्षभरात त्यालाही लगाम बसल्याचे दिसून आले आहे. वर्षभरात वाहिन्यांच्या मोक्याच्या वेळेत (प्राइम टाइम) राजकारणाशी संबंधित बातम्यांना मुख्य स्थान मिळाल्याचे एका अहवालात म्हटले आहे.

 

दिल्लीतील सेंटर फॉर मीडिया स्टडीज या संस्थेने ही पाहणी केली आहे. गेल्या वर्षी झालेली लोकसभेची निवडणूक तसेच त्यानंतर अनेक राज्यांत झालेल्या विधानसभांच्या निवडणुकांमुळे राजकीय बातम्यांना वृत्तवाहिन्यांच्या बातम्यांच्या यादीत अग्रक्रम मिळाला. अशीच परिस्थिती 2005 मध्येही पाहण्यास मिळाली होती. 2009 आधीच्या तीन वर्षात क्रीडा, मनोरंजन तसेच गुन्हेगारीविषयक बातम्यांना उधाण आले होते.

 2005 मध्ये राजकीय वार्ताकनाचे 23.1 टक्के असलेले प्रमाण 2009 मध्ये निवडणुका असूनही 20.36 टक्केच राहिले. 2008 मध्ये तर हे प्रमाण 10.49 टक्क्यांपर्यंत खाली घसरले होते. 2006, 07, 08 या काळात क्रीडाविषयक घडामोडींना सर्वाधिक प्राधान्य विविध वृत्तवाहिन्यांनी दिल्याचे या अहवालात नमूद केले आहे. गुन्हेगारीविषयक बातम्यांचे प्रमाणही 11.83 टक्क्यांवरून 4.86 टक्क्यांपर्यंत खाली आले होते. एकीकडे राजकीय बातम्यांना चांगली जागा मिळत असतानाच, विकासाशी संबंधित बातम्या मात्र या वाहिन्यांवर जागा मिळवण्यासाठी धडपडत होत्या, असेही या अहवालात नमूद केले आहे. जागतिक हवामानबदलावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या कोपनहेगन समिती संदर्भातील बातम्यांनाही वार्ताकनात चांगली जागा मिळाल्याचे दिसून आले. सहा प्रमुख राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांच्या अभ्यासानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

Marathi Online News

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0