महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत संमत
महिलांना लोकसभा तसेच विधानसभांमध्ये 33 टक्के आरक्षण देण्यासाठीचे विधेयक मंगळवारी राज्यसभेत आवाजी मतदानाने संमत झाले.
नवी दिल्ली- महिलांना लोकसभा तसेच विधानसभांमध्ये 33 टक्के आरक्षण देण्यासाठीचे विधेयक मंगळवारी राज्यसभेत आवाजी मतदानाने संमत झाले. महिला आरक्षण विधेयकात मागासवर्गीय महिलांसाठी पोटआरक्षण ठेवण्याच्या मागणीसाठी या विधेयकाला समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि लोक जनशक्ती पक्षाने तीव्र विरोध केला. या विधेयकावरून गोंधळ घालणा-या सात खासदारांवर निलंबनाची कारवाईही झाली.
या गोंधळातच राज्यसभेचे अध्यक्ष तसेच उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी राज्यसभेत हे विधेयक मतदानासाठी मांडले. आवाजी मतदानाने हे विधेयक राज्यसभेत संमत झाले. त्यानंतर या विधेयकावर चर्चा सुरू झाली आहे.
Marathi Online News
या बातमीचे गुणांकन करा



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा