PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत संमत महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत संमत ================================================================================ पीटीआय on 09 March, 2010 03:45:00 PM नवी दिल्ली- महिलांना लोकसभा तसेच विधानसभांमध्ये 33 टक्के आरक्षण देण्यासाठीचे विधेयक मंगळवारी राज्यसभेत आवाजी मतदानाने संमत झाले. महिला आरक्षण विधेयकात मागासवर्गीय महिलांसाठी पोटआरक्षण ठेवण्याच्या मागणीसाठी या विधेयकाला समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि लोक जनशक्ती पक्षाने तीव्र विरोध केला. या विधेयकावरून गोंधळ घालणा-या सात खासदारांवर निलंबनाची कारवाईही झाली. या गोंधळातच राज्यसभेचे अध्यक्ष तसेच उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी राज्यसभेत हे विधेयक मतदानासाठी मांडले. आवाजी मतदानाने हे विधेयक राज्यसभेत संमत झाले. त्यानंतर या विधेयकावर चर्चा सुरू झाली आहे.