पहिले पान | देश | महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत संमत

महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत संमत

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये 33 टक्के आरक्षण देणारे विधेयक राज्यसभेत186 विरुद्ध 01 अशा फरकाने संमत झाले आहे.

नवी दिल्ली- महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये 33 टक्के आरक्षण देण्यासाठीचे विधेयक मंगळवारी राज्यसभेत मंजूर झाले. 186 विरुद्ध 01 अशा फरकाने महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत मंजूर झाले.

राज्यसभेत गोंधळ घालणा-या सात खासदारांवर मंगळवारी राज्यसभा अध्यक्ष हमीद अन्सारी यांनी निलंबनाची कारवाई केली. महिलांना 33 टक्के आरक्षण देण्यासाठीचे घटनादुरुस्ती विधेयक अध्यक्षांनी राज्यसभेत आवाजी मतदानासाठी मांडले. मात्र विधेयकाच्या बाजूने असलेल्या भाजप आणि डाव्या पक्षांनीही चर्चेशिवाय मतदान घेण्यास विरोध केल्यामुळे विधेयकावर चर्चा सुरू झाली. चर्चा पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान घेण्यात आले.  

महिला आरक्षण विधेयक सोमवारीच राज्यसभेत मांडले गेले होते मात्र राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष आणि लोक जनशक्ती पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेत गोंधळ घातल्यामुळे विधेयकावर चर्चा होऊ शकली नव्हती.

दरम्यान, यूपीएचा घटक पक्ष तृणमूल काँग्रेसने या विधेयकावर मतदान करण्यास नकार दिला आहे. या विधेयकावरील मतदानाबाबत कोणतीही पूर्वसूचना मिळाली नसल्यामुळे पक्षाचे दोन खासदार मंगळवारी राज्यसभेत उपस्थित नव्हते. राज्यसभेत लोकशाही मूल्यांची बूज न राखता मतदान घेण्यात आल्याने लोकसभेत तृणमूल काँग्रेस लोक मतदान करणार नाही, असे पक्षाचे लोकसभेतील मुख्य प्रतोद सुदीप बंधोपाध्याय यांनी सांगितले.

 

 

Marathi Online News

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0