PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: सचिन हवाई दलाचा ‘ग्रुप कॅप्टन’ सचिन हवाई दलाचा ‘ग्रुप कॅप्टन’ ================================================================================ पीटीआय on 03 September, 2010 05:30:00 PM नवी दिल्ली- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला भारतीय हवाई दलाचा ग्रुप कॅप्टन सन्मान प्रदान करण्यात आला. राजधानीत शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात एअर चीफ मार्शल पी व्ही नाईक यांच्या हस्ते सचिनचा मानद ग्रुप कॅप्टन रँक प्रदान करण्यात आले. मानद ग्रुप कॅप्टन रँक मिळवणारा सचिनहा पहिला क्रिटेकपटू ठरला आहे. सचिनने क्रिकेटमध्ये केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल हवाई दलाकडून हा विशेष सन्मान करण्यात आला आहे. भारतीय हवाई दलाने जानेवारीमध्ये सचिनला मानद ग्रुप कॅप्टन पद देण्याची घोषणा केली होती. नामांकित व्यक्तींनी देशासाठी दिलेल्या योगदानाचा विचार करून त्यांना सशस्त्र दलांकडून मानद पदे दिली जातात. जास्तीत जास्त तरुणांनी हवाई दलामध्ये यावे, या उद्देशाने सचिनला हे पद देण्यात आल आहे. हवाई दलाने ग्रुप कॅप्टन रँक दिल्याबद्दल सचिनने त्यांचे आभार मानले. याआधी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देव याला भारतीय लष्कराने मानद लेफ्टनंट कर्नल पद प्रदान केले होत.