विमान इंधनाच्या आयातीला मंजुरी
आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या इंधनाच्या किमतींमुळे आर्थिक पेच निर्माण झालेल्या विमान कंपन्यांना दिलासा देताना हवाई इंधनाच्या थेट आयातीला केंद्रीय मंत्रिगटाने ग्रीन सिग्नल दिला.
नवी दिल्ली-आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या इंधनाच्या किमतींमुळे आर्थिक पेच निर्माण झालेल्या विमान कंपन्यांना दिलासा देताना हवाई इंधनाच्या थेट आयातीला केंद्रीय मंत्रिगटाने ग्रीन सिग्नल दिला. यामुळे या कंपन्यांना भरावा लागणारा अतिरिक्त कर वाचून खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच एअर इंडियाला कर्जरोखे व अन्य मार्गाने 7,400 कोटी उभारण्यालाही मंजुरी देण्यात आली आहे. मात्र 49टक्के एफडीआयचा प्रस्तावावर या बैठकीमध्ये निर्णय होऊ शकला नाही.इंधनावरील वाढलेल्या खर्चामुळे तोटा सहन करावा लागत असल्याने अनेक दिवसांपासून विमान कंपन्यांकडून हवाई इंधनाच्या थेट आयातीची मागणी करण्यात येत होती. हवाई इंधनाच्या थेट आयातीला मंत्रिगटाने मंजुरी दिली असली तरी एफडीआयबाबत आणखी वाट पहावी लागणार आहे. याबाबत नागरी हवाई मंत्रालय टिपण तयार करत असून लवकरच ते मंत्रिमंडळाला सादर करण्यात येणार असल्याचे नागरी हवाई वाहतूकमंत्री अजित सिंह यांनी सांगितले. तसेच एअर इंडियाच्या आर्थिक पुनर्रचनेवरही या बैठकीत विचार करण्यात आला असून यासाठी कर्जरोख्याच्या सहाय्याने भांडवल उभारण्यास परवानगी देण्यात आल्री. मात्र, थेट इंधन आयात आणि एअर इंडियाच्या आर्थिक पुनर्रचनेचा प्रस्तावावर अंतिम निर्णय मंत्रिमंडळ घेणार असल्याचे सिंग यांनी सांगितले.
दरम्यान, सरकारकडूनही 6600 कोटींचा भांडवल भरणाही करण्यात येणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. सध्या एअर इंडियावर 67,520 कोटींचे कर्ज असून त्यामध्ये खेळत्या भांडवलासाठीचे 21,200 कोटींचे कर्ज असल्याचे सूत्रांनी म्हटले. हवाई इंधनाच्या थेट आयातीबाबतची प्रक्रियेबाबत येत्या काही दिवसांत घेण्यात येईल, असेही या सूत्रांनी सांगितले.




Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा