पहिले पान | देश | उ.प्र.मध्ये पहिल्या टप्प्यात 62-64 टक्के मतदान

उ.प्र.मध्ये पहिल्या टप्प्यात 62-64 टक्के मतदान

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बुधवारी 62 ते 64 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिका-यांनी दिली.

लखनऊ- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात बुधवारी  62 ते 64 टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती निवडणूक अधिका-यांनी दिली. पावसामुळे सकाळच्या सत्रामध्ये मतदारांमध्ये फारसा उत्साह नव्हता मात्र दुपारनंतर मतदानासाठी अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत होते.  

सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे सुरुवातीला मतदान केंद्रांकडे मतदार फारसे फिरकले नाही. दुपारनंतर पाऊस थांबला त्यानंतर मोठ्या संख्येने मतदान झाले. अनेक ठिकाणांच्या मतदानकेंद्रांवर मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केले. उत्तरप्रदेश विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यांत मतदान झाले असून 1.71 कोटी मतदारांनी मतदान केले. यात 70 लाख महिला मतदार असल्याची माहिती निवडणूक अधिका-यांनी दिली. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या 403 उमेदवारांचे भवितव्य इव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे.  

पहिल्या टप्प्यात झालेल्या या निवडणुकीच्या रिंगणात दोन मंत्र्यांसह 31 खासदार, आणि 15 माजी मंत्र्यांचा समावेश आहे.

गोंदा जिल्ह्यातील मेहुणा विधानसभा मतदार संघामधील मतदान केंद्र तीन किलोमीटर लांब अंतरावर स्थलांतरीत केल्यामुळे नाराज झालेल्या  सुमारे 800 मतदारांनी या मतदानावर बहिष्कार घातला.  

उत्तरप्रदेशमध्ये अन्य टप्प्यांतील मतदान 11,15,19,23,28 आणि तीन मार्च रोजी होणार आहे. सर्व टप्प्यांतील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सहा मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0