पहिले पान | देश | ब्ल्यू फिल्म पाहणा-या मंत्र्यांचा राजीनामा

ब्ल्यू फिल्म पाहणा-या मंत्र्यांचा राजीनामा

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

कर्नाटक विधानसभेचे कामकाज सुरू असताना राज्य मंत्रिमंडळातील दोन सदस्य चक्क सदनातच मोबाईलवर अश्‍लील चित्रफीत पाहताना रंगेहाथ सापडले.

बंगळूरू- कर्नाटक विधानसभेचे कामकाज सुरू असताना राज्य मंत्रिमंडळातील दोन सदस्य चक्क सदनातच मोबाईलवर अश्‍लील चित्रफीत पाहताना रंगेहाथ सापडले. भारतीय जनता पक्षाच्या या नेत्यांची कृष्णकृत्ये सीसीटीव्हीवरून उघड झाल्यानंतर बुधवारी सकाळी या तीन मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले.

विजापूर जिल्ह्यातील सिंदगी येथे पाकिस्तानी झेंडा फडकावल्याच्या प्रकरणावर विधिमंडळात चर्चा सुरू असताना मोबाइलवरून ब्ल्यू फिल्म पाहताना सदनाचे कामकाजाचे वृत्त संकलन करणा-या एका वृत्तवाहिनीच्या कॅमे-याने या मंत्र्यांचे कारनामे टिपले. भाजपचे लक्ष्मण सावर्दी व सी. सी. पाटील हे मोबाईलवर अश्‍लील चित्रफीत पहातानाचे दृश्‍य टीव्हीवरून प्रसारित झाल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सावडी यांच्या घराबाहेर निदर्शने करुन या दोन्ही नेत्यांना अटक करण्याची मागणी केली होती. भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी दोन्ही नेत्यांकडे राजीनामे मागितले होते. दरम्यान, ही घटना उघड झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी पर्यावरण मंत्री जे. कृष्णा पालेमार यांचा मोबाईल असल्याचे सांगितले होते.

विधानसभेत सेक्‍स व्हिडिओ पाहत असताना सापडलेल्‍या या मंत्र्यांमुळे भारतीय जनता पक्षासमोर नामुष्‍कीची वेळ आली आहे. मंत्र्यांच्‍या या कृतीमुळे भाजप विरोधात ठिकठिकाणी निदर्शने करण्‍यात येत आहेत.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0