गुवाहाटी रेल्वेस्थानकावरुन 25 लाखांचे चरस जप्त
गुवाहटी रेल्वे स्थानकावर सीमा शुल्क विभागाने जम्मू-तावी रेल्वेगाडीतून शनिवारी सुमारे 25 लाख रुपयांचे चरस जप्त केले.
गुवाहाटी- गुवाहाटी रेल्वे स्थानकावर सीमा शुल्क विभागाने जम्मू-तावी रेल्वेगाडीतून शनिवारी सुमारे 25 लाख रुपयांचे चरस जप्त केले.
सीमा शुल्क विभागाला मिळालेल्या माहितीवरुन राबवलेल्या मोहिमेअंतर्गत सुमारे 25 किलो चरस जप्त केले. जम्मू-तावी रेल्वे गाडीमध्ये एका सीटखाली हे चरस लपवून ठेवल्याचे अधिका-यांनी सांगितले.
हे चरस उत्तर भारतातून आणले असल्याची शक्यता असून आंतरराष्ट्रीय बाजारातील त्याची किंमत 25 लाख रुपये असल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केली नसून अधिक चौकशी सुरू आहे.
Marathi Online News
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा