PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: साधू यादव यांचे निलंबन रद्द साधू यादव यांचे निलंबन रद्द ================================================================================ पीटीआय on 11 March, 2010 05:00:00 PM पाटणा- खासदार अनिरुद्ध प्रसाद उर्फ साधू यादव यांचे निलंबन काँग्रेसने गुरुवारी रद्द केले. महिला आरक्षण विधेयकाविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी बिहार काँग्रेसने यादव यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. मात्र यासंदर्भात यादव यांनी दिलेले स्पष्टीकरण पक्षाला पटल्याने त्यांचे निलंबन रद्द केल्याचे बिहार काँग्रेस अध्यक्ष अनिल शर्मा यांनी स्पष्ट केले. साधू यादव हे लालूप्रसाद यादव यांचे मेहुणे आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी राष्ट्रीय जनता दलातून बाहेर पडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.