PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: स्फोटकांच्या वाहतुकीसाठी नवीन नियम स्फोटकांच्या वाहतुकीसाठी नवीन नियम ================================================================================ पीटीआय on 09 March, 2010 03:55:00 PM नवी दिल्ली- नक्षलग्रस्त भागांतून शस्त्रे, दारुगोळा आणि स्फोटकांची वाहतूक करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम तयार केले आहेत. एका राज्यातून दुस-या राज्यात स्फोटके, शस्त्रे घेऊन जाणा-या वाहनांच्या मार्गात नक्षलग्रस्त भाग येत असेल, तर या वाहनांना राज्य सरकारांनी कडेकोट सुरक्षा पुरवावी, असे निर्देश केंद्रीय गृहखात्याने दिले आहेत. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) महासंचालक एन आर दास यांनी ही माहिती दिली. नवीन नियमांनुसार स्फोटकांची वाहतूक फक्त दिवसाच केली जाईल. त्याचप्रमाणे ठराविक अंतरावर वाहनांची तपासणी होईल. त्याचप्रमाणे खाणींच्या भागांमध्ये स्फोटकांचा साठाही कमी करण्याचे निर्देश गृहखात्याने दिले आहेत. हा साठा वेगवेगळ्या ठिकाणी करण्यापेक्षा एकाच ठिकाणी ठेवल्यास सुरक्षा पुरवणे सोपे जाईल, असेही गृहखात्याच्या अधिका-यांनी सांगितले.