पहिले पान | देश | 1984 दंगली- सज्जन कुमार यांना समन्स

1984 दंगली- सज्जन कुमार यांना समन्स

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
image

दिवंगत पंतप्रधान इंदीरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीच शिखांविरुद्ध झालेल्या दंगलींच्या खटल्यात काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना दिल्ली न्यायालयाने समन्स जारी केला आहे.

नवी दिल्ली- दिवंगत पंतप्रधान इंदीरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीच शिखांविरुद्ध झालेल्या दंगलींच्या खटल्यात काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना दिल्ली न्यायालयाने समन्स जारी केला आहे. या खटल्यात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर सज्जन कुमार आणिअन्य काही जणांना न्यायालयाने समन्स जारी केला.

येथील मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी लोकेश कुमार शर्मा यांनी सज्जन कुमार यांना 17 फेब्रुवारीपूर्वी न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध अजामीनपात्र नोटीस बजावण्याची याचिका सीबीआयने केली होती. मात्र साक्षीदारांकडून आरोपींविरुद्ध कोणतीही तक्रार आलेली नाही. तसेच सर्व आरोपींचे राहण्याचे ठिकाण स्थिर असल्याचे कारण देत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0