PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: मुख्यमंत्र्यांनी घेतली अहलुवालिया यांची भेट मुख्यमंत्र्यांनी घेतली अहलुवालिया यांची भेट ================================================================================ पीटीआय on 11 March, 2010 07:40:00 PM नवी दिल्ली- करांमध्ये वाढ न करता उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याच्या पर्यायांवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गुरुवारी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मोंटेकसिंग अहलुवालिया यांची भेट घेतली. ही चर्चा अनौपचारिक स्वरूपाची होती, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले. राज्याचा अर्थसंकल्प येत्या 25 मार्च रोजी सादर होणार असून त्यासंदर्भात नियोजन आयोगाकडून मार्गदर्शन घेण्यासाठी ही चर्चा होती, असे मुख्यमंत्री म्हणाले. उत्पन्नवाढीसाठी कर तसेच शुल्कांमध्ये वाढ करण्यावर काही मर्यादा आहेत. त्यामुळे खासगी-सरकारी भागीदारीतून उत्पन्नाचे काही पर्याय शोधता येतील का यावर अहलुवालिया यांच्याशी चर्चा केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.