PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: केंद्रीय मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक लांबणीवर केंद्रीय मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक लांबणीवर ================================================================================ पीटीआय on 11 March, 2010 08:00:00 PM नवी दिल्ली- केंद्रीय मंत्रिमंडळाची गुरुवारी संध्याकाळी होणारी साप्ताहिक बैठक लांबणीवर पडली आहे. कॅबिनेट बैठकीसोबतच आर्थिक व्यवहारांसदर्भातील कॅबिनेट समितीची तसेच पायाभूत सुविधांसंदर्भातील कॅबिनेट समितीची बैठकही लांबणीवर पडली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी लोकसभेचे कामकाज संध्याकाळी उशीरापर्यंत चालू राहण्याची शक्यता लक्षात घेऊन कॅबिनेट बैठक लांबणीवर टाकण्यात आली आहे. गेले तीन दिवस महिला आरक्षण विधेयकावरून चाललेल्या गोंधळामुळे अर्थसंकल्पावर चर्चा होऊ शकली नव्हती.