पहिले पान | देश | अणुऊर्जेच्या क्षेत्रात सहकार्यासाठी रशिया उत्सुक

अणुऊर्जेच्या क्षेत्रात सहकार्यासाठी रशिया उत्सुक

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

अणुऊर्जेच्या क्षेत्रात भारताला मदत करण्यास रशिया उत्सुक असल्याचे रशियाचे पंतप्रधान व्लादिमिर पुतीन यांनी सांगितले आहे.

नवी दिल्ली- अणुऊर्जेच्या क्षेत्रात भारताला मदत करण्यास रशिया उत्सुक असल्याचे रशियाचे पंतप्रधान व्लादिमिर पुतीन यांनी सांगितले आहे. भारतामध्ये अणू संयंत्रांच्या उभारणीसाठी रशिया मदत करेल तसेच अणुइंधनाचा पुरवठाही करेल, असे पुतीन यांनी नमूद केले. अण्विक कच-याच्या व्यवस्थापनासाठीही भारताने रशियाची मदत मागितली आहे, असे त्यांनी सांगितले. 

सध्या भारत दौ-यावर आलेल्या पुतीन यांनी शुक्रवारी दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि बेंगळूरुच्या उद्योजकांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.  

अणुऊर्जा प्रकल्पांच्या सुरक्षिततेसाठीच्या अत्याधुनिक उपाययोजना हे रशियन तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य असून त्याचा फायदा भारताला करून देण्यास रशिया उत्सुक असल्याचे पुतीन म्हणाले. रशियन अण्विक संयंत्र जगातील सर्वात सुरक्षित समजली जातात. रशिया भारतात 12 ते 14 नवीन संयंत्र उभारून देणार आहे. अणुऊर्जेच्या क्षेत्रात रशिया भारतासोबत धोरणात्मक भागीदारी विकसित करत असल्याचे पुतीन म्हणाले.

Marathi Online News

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0