PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: दहशतवादाला पाकिस्तानचा पाठिंबा- चिदंबरम दहशतवादाला पाकिस्तानचा पाठिंबा- चिदंबरम ================================================================================ पीटीआय on 12 March, 2010 06:15:00 PM नवी दिल्ली- भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग नसल्याचा पाकिस्तानचा दावा फेटाळून लावत, लष्कर-ए-तय्यबा आणि अन्य दहशतवादी संघटनांना आयएसआयची मदत मिळत असल्याचा थेट आरोप केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांनी शुक्रवारी केला. आयएसआयच्या मदतीने या दहशतवादी संघटना भारतात स्लीपर सेल्स चालवत असल्याचेही ते म्हणाले. दहशतवादाचा पुरस्कार करणे हे पाकिस्तानचे सरकारी धोरणच असेल, तर त्यांच्याशी वाटाघाटी तरी काय करणार, असा प्रश्न चिदंबरम यांनी उपस्थित केला. ते इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होते. लष्कर-ए-तय्यबा, हिजबुल मुजाहिदीन, जमात-उद-दावा, अल बद्र या दहशतवादी संघटनांना आयएसआयची मदत मिळत असल्याची बाब उघड आहे, असेही ते म्हणाले. दोन्ही देशांच्या परराष्ट्र सचिवांमध्ये झालेल्या बैठकीतून काही निष्पन्न झालेले नाही. मात्र भारत या चर्चेच्या पुढील फेरीसाठी तयार आहे, असे गृहमंत्री म्हणाले.