पहिले पान | देश | ओदिशात विषारी दारुचे 19 बळी

ओदिशात विषारी दारुचे 19 बळी

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

ओदिशामध्ये विषारी दारुप्रकरणातील मृतांची संख्या 19 झाली असून या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

कटक- ओदिशामध्ये विषारी दारु प्यायलाने मरण पावलेल्यांची संख्येत वाढ होत असून बुधवारी 14 जण मरण पावले आहेत. त्यामुळे विषारी दारूमुळे मरण पावलेल्यांची संख्या 19 झाली आहे. विषारी दारू प्यायलेल्यां पैकी आणखी 14 जणांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची  न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मंगळवारी पाच जणांचा मृत्यू झाला होता. 

भुवनेश्वरजवळील एका औषधनिर्माण कंपनीतील खोकल्याचे औषध दारुमध्ये मिसळून ही दारू  सोमवारी रात्री महिदरपाडा परिसरातील लोकांनी प्यायली. ही दारू प्यायल्यानंतर 13 जणांना उलट्या, चक्कर,डोकेदुखीचा त्रास झाल्याने त्यांना तातडीने नजीकच्या  रुग्णालयात दाखल केल्यानंतर मंगळवारी पाच जणांचा मृत्यू झाला होता. बुधवारी 14 जणांचा मृत्यू झाल्याने या विषारी दारू प्रकरणातील बळींची संख्या 19 झाली आहे.  याप्रकरणातील 14 जणांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा  आणखी वाढण्याची शक्याता वैद्यकीय प्रशासनाने व्यक्त केली आहे.

या औषधनिर्माण कंपनीला पोलिसांनी सील ठोकले असून  कंपनीच्या मालकांची चौकशी चालू आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी दिले आहेत.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0