लष्करप्रमुखांच्या याचिकेवर 10 फेब्रुवारीला सुनावणी
लष्करप्रमुख जनरल व्ही.के. सिंह यांच्या वयाबाबतच्या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दहा फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली.
नवी दिल्ली- लष्करप्रमुख जनरल व्ही.के. सिंह यांच्या वयाबाबतच्या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दहा फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली. सिंह यांच्या वयावरुन चाललेल्या वादावर सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते, मात्र न्यायालयाने सिंह यांच्या नियुक्तीवेळी चुकीची प्रक्रिया अवलंबल्याची शक्यता व्यक्त करत केंद्र सरकारला आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी या याचिकेवरील सुनावणी दहा फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर सोडल्याने तोपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
सिंह यांच्या दहा मे 1950 आणि दहा मे 1951 अशा दोन जन्मतारखांच्या नोंदी सरकार दप्तरी आहेत. यापैकी दहावीच्या प्रमाणपत्रावर असलेली दहा मे 1951 ही तारीख ग्राह्य धरण्यात यावी अशी लष्करप्रमुखांची मागणी आहे. मात्र यूपीएससीने घेतलेल्या एनडीएच्या परीक्षा फॉर्मवर दहा मे 1950 ही तारीख नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे ही तारीख ग्राह्य धरण्यात येऊन सिंह यांची निवृत्ती ही सरकारी तारखेप्रमाणे होईल असे सरकारचे म्हणणे आहे. या वादामुळे लष्करप्रमुखांनी सरकारविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
केंद्रीय संरक्षणमंत्री ए.के.एंटोनी यांनी गेल्या वर्षी 30 डिसेंबरला जारी केलेल्या आदेशामध्ये लष्करप्रमुखांची जन्मतारीख 1950 ग्राह्य मानावी असे म्हटले आहे.
यावर न्यायमूर्ती आर.एम.लोढा व न्यायमूर्ती गोखले यांच्या खंडपीठाने सरकार हा आदेश मागे घेणार आहे का अशी विचारणाही केली.





Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा