पहिले पान | देश | सोनिया गांधी यांची चौथी ‘टर्म’

सोनिया गांधी यांची चौथी ‘टर्म’

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोनिया गांधी यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांचीच बिनविरोध निवड होणार आहे.

नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्षपदासाठी सोनिया गांधी यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांचीच बिनविरोध निवड होणार आहे. शुक्रवारी त्याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे. चौथ्या वेळेस त्यांच्या गळ्यात या पदाची माळ पडणार आहे,

 

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरच्या दिवशी सोनिया गांधी यांच्यावतीने पाच नामांकन अर्ज दाखल झाले.

 

काँग्रेस मुख्यालयात शुक्रवारी त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा होईल, त्यानंतर त्यांना निवडीचे पत्र दिले जाईल. या घोषणेनंतर पक्ष कार्यकारिणी बरखास्त केली जाईल. डिसेंबरमध्ये होणा-या पक्षाच्या अधिवेशनात नव्या कार्यकारिणी घोषणा होईल, असे पक्षाच्या मध्यवर्ती निवडणूक समितीचे अध्यक्ष ऑस्कर फर्नाडिस यांनी सांगितले.

 

तत्पूर्वी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या नेत्यांच्या एका गटाने सोनिया गांधी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्री तसेच पक्ष कार्यकारिणी सदस्यांचा समावेश असलेल्या दुस-या गटाने तसेच पक्षाचे खजिनदार मोतीलाल व्होरा यांच्या नेतृत्वाखालील अन्य गटाने फर्नाडिस यांची भेट घेतली. व्होरा यांच्या गटात पक्ष सरचिटणीस राहुल गांधी यांचाही समावेश होता. राहुल गांधी यांनी सोनिया गांधी यांच्या वतीने फर्नाडिस यांच्यासमोर अर्ज दाखल केले. काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही सोनिया गांधी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता.

 

तत्पूर्वी, पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राहुल गांधी तसेच प्रणव मुखर्जी यांनी 10, जनपथवर सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांची या उमेदवारीसाठी अनुमती घेतली होती.

 

काँग्रेसचा लोकशाही प्रक्रियेवर विश्वास आहे. ही निवडणूकही त्याच प्रक्रियेनुसार होत आहे. पक्ष अडचणीत असताना सोनिया गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर पक्षाने दैदिप्यमान प्रवास केला आहे, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच केंद्रीय मंत्री आर. पी. एन. सिंग यांनी पत्रकारांना सांगितले.

 सन 1998 मध्ये दिवंगत काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांच्या उत्तराधिकारी म्हणून निवड झालेल्या सोनिया गांधी यांनी सर्वाधिक काळ हे पद भूषवण्याचा विक्रम केला आहे. या कालावधीत काँग्रेस अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत पक्षाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र प्रसाद यांनी दिलेले आव्हान वगळता सोनिया गांधी यांची या पदावर बिनविरोध निवड झाली आहे.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0