आरक्षण विधेयकासाठी भाजप पक्षादेश काढणार
सर्व खासदारांनी महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने मतदान करावे असा पक्षादेश (व्हिप) जारी करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे.
नवी दिल्ली- सर्व खासदारांनी महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने मतदान करावे असा पक्षादेश (व्हिप) जारी करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांच्या निवासस्थानी झालेल्या पक्षाच्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय झाला.
पक्षातील काही खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान करण्याची धमकी दिल्यामुळे पक्षादेश जारी करण्याचा निर्णय पक्षनेत्यांना घ्यावा लागला, असे समजते.
या बैठकीला राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली, माजी पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह उपस्थित होते.
महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत प्रचंड बहुमताने संमत झाले आहे. राज्यसभेत भाजप खासदारांनी या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. मात्र लोकसभेतही हे विधेयत संमत झाल्यास लोकसभा आणि विधानसभांतील एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव ठेवाव्या लागतील आणि या पुरुषांच्या जागा धोक्यात येतील. त्यामुळे काही खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान करण्याचा इशारा दिल्याचे समजते.



प्रहारच्या फेसबुक पेजला 'लाइक' करा
Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा