PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: आरक्षण विधेयकासाठी भाजप पक्षादेश काढणार आरक्षण विधेयकासाठी भाजप पक्षादेश काढणार ================================================================================ पीटीआय on 11 March, 2010 03:30:00 PM नवी दिल्ली- सर्व खासदारांनी महिला आरक्षण विधेयकाच्या बाजूने मतदान करावे असा पक्षादेश (व्हिप) जारी करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांच्या निवासस्थानी झालेल्या पक्षाच्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय झाला. पक्षातील काही खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान करण्याची धमकी दिल्यामुळे पक्षादेश जारी करण्याचा निर्णय पक्षनेत्यांना घ्यावा लागला, असे समजते. या बैठकीला राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली, माजी पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह उपस्थित होते. महिला आरक्षण विधेयक राज्यसभेत प्रचंड बहुमताने संमत झाले आहे. राज्यसभेत भाजप खासदारांनी या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. मात्र लोकसभेतही हे विधेयत संमत झाल्यास लोकसभा आणि विधानसभांतील एक तृतीयांश जागा महिलांसाठी राखीव ठेवाव्या लागतील आणि या पुरुषांच्या जागा धोक्यात येतील. त्यामुळे काही खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान करण्याचा इशारा दिल्याचे समजते.