पंजाबचे माजी मुख्यमंत्री ब्रार यांचे निधन
पंजाबचे माजी मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरचरणसिंग ब्रार यांचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले.
मुक्तसर - पंजाबचे माजी मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरचरणसिंग ब्रार यांचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८७ वर्षाचे होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा आणि मुलगी आहेत.
चंडीगढमधील पंजाव आणि हरियाणा विधानसभेच्या इमारतीबाहेर झालेल्या कारबॉम्ब-स्फोटात पंजाबचे माजी मुख्यमंत्री बिआंतसिंग मृत्युमुखी पडल्यानंतर ३१ ऑगस्ट १९९५ रोजी ब्रार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. १ नोव्हेंबर १९९६ पर्यंत ते या पदावर होते. तत्पूर्वी त्यांनी २४ सप्टेंबर १९७७ ते ९ डिसेंबर १९७९ या कालावधीत हरयाणाचे राज्यपालपदही भूषवले होते.
Marathi Online News
या बातमीचे गुणांकन करा



Facebook
Twitter
Google
MySpace
राशीभविष्य
प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):
तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा