कोलाज
आरोग्याची ऐशी तैशी!
20 May, 2012 08:25:00 AM
नुकत्याच सुरू झालेल्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाने स्त्री-भ्रूणहत्या हा विषय पहिल्याच भागात समोर आणल्यावर भारतातल्या सामाजिक समस्या आणि आमीर खानची ‘शो’बाजी अशा दोन्ही विषयांवर एकाच वेळी चर्चा सुरू झाली आहे. ज्याच्याकडे आजही मोठय़ा आदराने पाहिले जाते, तो वैद्यकीय व्यवसाय या आधी कधीही एवढय़ा खालच्या पातळीवर पोहचला नव्हता. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला बरे करण्याऐवजी त्याचा जास्तीत जास्त खिसा कसा कापता येईल, याचाच हल्लीची डॉक्टर मंडळी विचार करतात. डॉक्टरी भाषेत ‘कट प्रॅक्टिस’ म्हणवल्या जाणा-या या देवघेवीने वैद्यकीय व्यवसाय पोखरून टाकला आहे. एका बाजूला भारतीय वेगवेगळ्या आजारांचे बळी ठरत असताना, वैद्यकीय व्यवसायाची ही ढासळती नीतिमत्ता अधिकच चिंताजनक वाटते. त्यावर इलाज होत नाही तोवर भारतीयांना सार्वजनिक आरोग्यसेवेचा हक्क मिळणे अवघड आहे.
मुंबईचा पहिला अनभिषिक्त सम्राट!
20 May, 2012 06:10:00 AM ‘शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये’ असे म्हणतात. पण शहाण्या माणसाचा राजकारणातही निभाव लागत नाही. बुद्धिमत्ता, कर्तृत्व आणि धडाडी असलेल्या स. का. पाटील यांनी काँग्रेसमध्ये अतिशय महत्त्वाची कामगिरी केली. पण बेरजेच्या राजकारणात त्यांचा निभाव लागला नाही. काँग्रेसने आणि महाराष्ट्रानेही या नेत्यावर अन्यायच केला. 24 मे रोजी स. का. पाटील यांची ३१वी पुण्यतिथी आहे, त्यानिमित्ताने हा विशेष लेख.....ख्रिश्चन अस्तित्ववाद
20 May, 2012 07:10:00 AM आदर्शवाद, समाजवाद, साम्यवाद या सर्वातून वैचारिक प्रवास झालेल्या युनॅमुनोचा विज्ञानातून होणा-या मानवाच्या प्रगतीवरील विश्वास उडाला. तो मार्क्सवादाचा पक्का विरोधक बनला. अमरत्वाची माणसाला असलेली ओढ मान्य केली पाहिजे, असे त्याचे मत झाले. देवाचे अस्तित्व बुद्धीच्या आधारे सिद्ध होत नाही; पण ती लोकांची भावनात्मक गरज आहे, म्हणून श्रद्धेला पर्याय नाही....माहेरचा गडी, बांगड्या काढी
20 May, 2012 07:00:00 AM दुस-या दिवशी या प्रकाराबाबत वृत्तपत्रांचे रकानेच्या रकाने भरून बातम्या आल्या. कोल्हापूरमध्ये आरोपीबद्दल तीव्र संताप निर्माण झाला. त्याच्या घरावर जोरदार दगडफेक झाली. पोलिस स्टेशनबाहेर शेकडो लोक जमले. मानकरला आमच्या ताब्यात द्या, त्याला ठेचून मारतो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला....निमित्त व्यंगचित्राचे, हेतू हस्तक्षेपाचा!
20 May, 2012 06:30:00 AM सामाजिक शास्त्रामध्ये काय शिकवावे, कोणते पुस्तक असावे, या बद्दलचा निर्णय हा त्या अभ्यासशाखेची पूर्ण माहिती असणारा अभ्यासक घेतो. मात्र यात समाजाकडून व संघटनाकडून हस्तक्षेप होतो. लोकक्षोभामुळे शिक्षक चांगली पुस्तके लिहीत नाहीत. प्रकाशक ती छापत नाहीत आणि ती शिकवलीही जात नाहीत. यामुळे सामाजिक शास्त्रावर शासनाप्रमाणेच लोकक्षोभाचेही नियंत्रण येते....या शतकात तिचं जगणं महत्त्वाचं आहे!
20 May, 2012 06:25:00 AM तिच्या जगण्यात जगण्याची आगतिकता आहे. शिकवून पोराला मोठं करण्याची ओढ आहे. परिस्थितीच्या व जिवनाच्या किर्द जंगलात भटकलेल्या हरणाची आवस्था आणि अस्वस्थता तिच्या जगण्यात आहे. माणुसकीनं जगण्याची तळमळ व आकाशात उडण्याचं स्वप्न तिच्यात ठायीठायी आहे. तिनं शेळ्या राखून आर्थिक परिस्थितीच्या वावटळीतून स्वत:ची सुटका केली. इकडे आड तिकडे विहीर आशा दोलायनमान स्थितीतही ती जगली. तिच्या व्यथा-वेदना तिच्या नवऱ्यांना व नातेवाईकाला कळल्या नाहीत. तिची एकटीची ती लढाई आहे म्हणून या शतकात तिचं जगणं महत्त्वाचं आहे....सार्वत्रिक शिक्षण आणि दर्जा
20 May, 2012 06:15:00 AM ज्ञाननिर्मिती ही गोष्टच मुळात सर्व समाजव्यवहाराशी निगडित असल्यानं ती सार्वत्रिक झाल्यानं दर्जा घसरत नाही. सर्व जगभर आजवर झालेल्या समाजव्यवहारातून तयार झालेलं हे ज्ञान पुढील पिढीकडे हस्तांतरित करणं हे शिक्षणाचं प्रमुख उद्दिष्ट. त्याचा विचार करता शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण झाल्यानं ज्ञानाप्रमाणे शिक्षणाचा दर्जाही घसरत नाही. समाजाच्या गरजा भागवण्यासाठी करावयाचं उत्पादन म्हणजेच संपत्तीची निर्मिती ही दर्जेदार करावयाची तर उत्पादन करणारी सर्व समाजाची श्रमशक्ती दर्जेदार असली पाहिजे. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणानं हा दर्जा खाली तर येत नाहीच, उलट शिक्षणामुळे श्रमशक्ती अधिक कार्यक्षम बनते व समाज प्रगती करतो, असंच मत आजवर बहुतांशी शिक्षणतज्ज्ञांनी दिलेलं आहे....उच्चभ्रूंचा बॉम्बे क्लब
20 May, 2012 05:50:00 AM 1940 च्या आसपास बॅकबे रेक्लमेन्शनचं काम पूर्ण झाल्यावर बॉम्बे क्लब, एस्पेलेनेड रोड येथून मरिन ड्राइव्ह येथील एका इमारतीत स्थलांतरित झाला. एस्प्लेनेड रोड येथील बॉम्बे क्लबची इमारत पाडण्यात आल्यानंतर तिथे बँक ऑफ इंडिया आणि हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशनच्या इमारती बांधण्यात आल्या. या क्लबमध्ये भारतीय आणि महिलांना प्रवेश नाकारण्यात आल्या कारणाने अखेर 1958 मध्ये हा क्लब बंद करण्यात आला....हजयात्रा आणि सबसिडी
20 May, 2012 05:30:00 AM कुराणमध्ये हजयात्रेच्या संदर्भात ज्यांची क्षमता असेल त्यांनीच हजयात्रा करावी असे म्हटले आहे. त्याचा अर्थ काही जाणकार असा लावतात की, भीक मागून वा कर्ज काढून हजयात्रा करता येत नाही. अवैध व गरमार्गाने मिळवलेले पैसे हजयात्रेसाठी वापरणे हराम आहे. या आधारे हजयात्रेची सबसिडी अमान्य करतात. सबसिडी म्हणजे भिक्षा हजला चालत नाही. पण सर्वच विद्वान हे मत मान्य करत नाहीत....नंबरी अकाउंट
20 May, 2012 05:25:00 AM माझा अकाउंट नंबर 421 होता. नंतर तू बँकेत लागलास आणि तुमची डिपॉझिट मोबिलायझेशन ड्राईव्ह झाली तेव्हा तू खातं खोलण्याची गळ घातलीस. लक्षात राहील असा नंबर दे असं मी तुला बजावलं तेव्हा तू मला 1760 हा नंबर दिलास. इतकी र्वष झाली तरी हे नंबर माझ्या लक्षात आहेत. आताच काय अवदसा आठवली तुम्हा लोकांना?...मोस्ट कमेंटेड















































































































राशीभविष्य