कोलाज
सायनचे दिवस
08 April, 2012 04:30:00 AM
स्वस्त रुग्णसेवेचा ध्यास घेऊन आयुष्यभर यशस्वी प्रयोग केलेल्या मुंबईतील नामवंत सर्जन डॉ. सदानंद नाडकर्णी यांचं ‘माझं प्रिस्क्रिप्शन’ हे आत्मकथन पुण्याच्या ‘समकालीन प्रकाशना’च्या वतीनं नुकतंच प्रकाशित झालं आहे. स्वस्त आरोग्यसेवा शक्य आहे व त्यासाठी काय करायला पाहिजे, याचं प्रतिपादन डॉ. नाडकर्णी यांनी या पुस्तकात केलं आहे. या पुस्तकातील एका प्रकरणाचा संपादित भाग.
जे जगाला कळते.. ते आपल्याला का नाही?
01 April, 2012 05:30:00 AM माणूस असो वा राष्ट्र, ऊर्जेशिवाय या जगात कोणाचीच प्रगती होत नाही. आज आपल्या राज्यात, देशात वीजटंचाईने कहर माजवला आहे. ती टंचाई दूर करण्यासाठी अणुऊर्जेशिवाय दुसरा पर्याय नाही, हे सिद्ध होत आहे. एकेकाळी विनाशाचे प्रतीक बनलेली अणुभट्टी जर विकासाला जन्म देणार असेल, तर भारतासारख्या देशाने या संधीचा लाभ घेणे आवश्यक आहे. मुख्य म्हणजे अणुऊर्जेने आपल्यासमोर स्वस्त आणि स्वच्छ वीजनिर्मितीचा पर्याय खुला करून र्सवकष विकास दृष्टिपथात आणला आहे. या आधी जगात युद्धाला, अणुबॉम्बला विरोध करणा-या संघटना दिसत. हल्ली त्याच स्टाईलने काही सुपारीबाज संस्था-संघटना परकीय एजंटांकडून लाच घेऊन जैतापूर वा कुडानकलमला विरोध करताना दिसतात. ही गोष्ट संतापजनक आहे. या प्रवृत्तींना वेळीच लोकांनी रोखले पाहिजे, तरच विकासाची गंगा तळागाळातल्या लोकांपर्यंत जाईल.....लौकिकापल्याडचा कवी
01 April, 2012 05:30:00 AM अंतरीच्या वेदना त्यांनी आपल्या कवितांमधून मांडल्या. लौकिकाच्या पलीकडचा असा हा कवी होता. त्यांची कविता गूढ असली तरीही ती हृदयस्पर्शी आहे. काळजापर्यंत पोहोचण्याची क्षमता त्यांच्या कवितांमध्ये आहे. मराठी काव्यसृष्टीला वेगळी वाट दाखवण्याचं काम त्यांनी सातत्याने केलं. आपल्या लेखनातून त्यांनी आत्मनिष्ठता जपली. त्यांच्या कवितांमध्ये अरण्य, घोडे, गायीचे करुणामय डोळे इत्यादींच्या प्रतिमा फार सुरेखपणे येतात. गाय जशी हंबरते तशी म्हणावी गाणी, असं त्यांनी एके ठिकाणी म्हटलं आहे. त्यांच्यापूर्वी अन्य कोणत्याच लेखक-कवीनं इतकं प्रतीकात्मक लेखन केलं नसेल. त्यांचं लेखन लौकिकाच्या पलीकडचं होतं आणि व्यक्तिमत्त्वही!...साहित्यविश्वाचा रहस्य शरणार्थी
01 April, 2012 05:30:00 AM प्रख्यात कवी ग्रेस यांच्या जाण्याने साहित्यविश्वाची जी हानी झाली आहे, ती शब्दात व्यक्त करता येणार नाही. स्वत:ची लय, प्रतिमासृष्टी यातून ग्रेस यांची कविता नेहमीच बहरत गेली. त्यांच्या कवितांवर दुबरेधपणाची टीका होऊनही त्यांनी त्याची कधी पर्वा केली नाही. आधी कठीण वाटणारी त्यांची कविता उलगडायची, तेव्हा त्यामध्ये दडलेला वैश्विक अर्थ जाणवायचा. त्यांच्या कवितेतील नवाई आणि आत्मपरता भावात्म नादलयीच्या अंगानं बहरत गेली. मृत्यू आणि एकटेपण यांचं उदास भान आणि त्यातून निर्माण होणारी करुणा हे त्यांच्या कवितेच्या मूलाशयाचे महत्त्वाचे घटक. ‘मी रहस्य शरणार्थी आहे’, असं ग्रेस मोठय़ा अभिमानानं सांगत असत. त्यांच्या जाण्यानं अशा असंख्य आठवणी मनाच्या कप्प्याला टोचत आहेत....किंमत हिंमतरावची
01 April, 2012 05:30:00 AM समाजातल्या सत्प्रवृत्त आणि दुष्प्रवृत्त, चांगल्या आणि वाईट, सज्जन आणि खतरनाक अशा सा-या लोकांशी पोलिसांचा संबंध येतो. त्यातून माणसांच्या आयुष्याचे कधी चांगले तर कधी चक्रावून टाकणारे पैलू समोर येतात. या साप्ताहिक सदरामधून अशाच काही सत्य घटनांवरील आधारित प्रकरणांची ओळख पोलिस सेवेत असलेले अधिकारी करून देतील. त्यातून सुजाण वाचकांना योग्य तो बोधही घेता येईल....तुमचं मूल स्किझोफ्रेनिक आहे काय?
01 April, 2012 05:30:00 AM स्किझोफ्रेनिया जडण्याची मानसिक कारणं म्हणजे रुग्णाच्या पूर्वायुष्यातले बालपणीचं घरातील वातावरण, उदा. कडक शिस्त, मुलांकडे पालकांचं होणारं दुर्लक्ष अथवा हेटाळणी. त्यामुळे भावनिकदृष्टय़ा येणारा कमकुवतपणा, पालकांचा स्वभाव, त्यांच्या मुलांकडून असलेल्या एकांगी, अपरिपक्व अपेक्षा, मुलांची स्वत:ची ताण सहन करण्याची नसíगक क्षमता. या घटकांचा जैविक अनुवांशिक घटकांशी संयोग होऊन त्या व्यक्तीला स्किझोफ्रेनिया जडण्याचा धोका वाढतो. ...सामर्थ्य आहे साधनांचे!
01 April, 2012 05:30:00 AM बऱ्याच वेळेला असे होते की, करायला कठीण व वेळखाऊ साधनांचे वरिष्ठांकडून कौतुक होते. त्यामुळे शिक्षक आपला उपलब्ध वेळ व पैसा अशी साधने तयार करण्यावर खर्च करतात. शाळा तपासणीच्या वेळेस ती साधने दाखवायची असल्याने ती जपून ठेवतात. त्यांचा वापर शिकण्यासाठी होतच नाही. शैक्षणिक साधन आकर्षक असायला हवे, हे खरेच; पण शिकण्या-शिकवण्यासाठी ते किती उपयोगी आहे, यावरून त्याचे मूल्यमापन व्हायला हवे....माझ्यातल्या लेखकाला वाचवा रे कोणी तरी..!
01 April, 2012 05:30:00 AM सालं हे वांझोटं लेखन देऊ शकत नाही आंधळय़ांना क्षितीजापलीकडे बघण्याची, लंगडय़ाना चालण्याची, मुक्यांना बोलण्याची, मरणाऱ्यांना जगण्याची, भुकेलेल्यांना भाकरीची, समुद्रात आडकलेल्यांना किना-यावर नेण्याची ग्वाही. साला लेखनाने दिली पाहिजे तरुणांना कामाची. बलात्कारीत मायबहिणीला न्यायाची, माणसाला माणुसकीची, ऊसवलेल्यांना शिवण्याची, मांडलेल्यांना जोडण्याची, रडणा-यांना हसवण्याची, भटक्यांना स्थिरतेची, शोषीतांना बंड करण्याची आन् निगरगट्ट राजकारन्यांना झुकविण्याची नवी ऊमेद. ...सचिवांची कार्यालयं!
01 April, 2012 05:30:00 AM सतराव्या शतकापासून 1758 पर्यंत सरकारचे वेगवेगळ्या विभागांचे सचिव मुंबई किल्ल्यातील काही खोल्यांतून बसत. हा पुढे किल्ला जमीनदोस्त झाला, तेव्हा लवकर कायमस्वरूपी कार्यालय मिळण्याची शक्यता दिसत नसल्यानं 1760 मध्ये मुंबईच्या जिल्हाधिका-यांना कार्यालयासाठी इमारत भाडय़ानं घेण्याची मुभा देण्यात आली. परंतु सेक्रेटरी आणि अकाउंटंट विभागाला कार्यालयासाठी जागा मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी जागेअभावी आपली कशी गैरसोय होतेय, हे सांगणारं संयुक्त पत्रच सरकारला लिहिलं....मास एप्रिल!
01 April, 2012 05:30:00 AM बाबासाहेब म्हणजे नवसाला पावणारा कुठल्या गल्लीतला ‘राजा’ नव्हे, जागृत देवस्थान नव्हे, रामायण, महाभारतातील पात्र नव्हे की पंढरपूरचा विठोबा नव्हे! तरीही त्यांच्या नावे या एप्रिल महिन्यात केवळ जागरण नव्हे तर जनजागरण होते! एका नेत्याच्या स्मरणार्थ, जवळपास महिनाभर परिवर्तनाचा विचार व्याख्यानं, परिसंवादांच्या माध्यमातून जपणारा आंबेडकर जयंती हा एकमेव उपक्रम उभ्या भारतात असावा!...मोस्ट कमेंटेड

















































































































राशीभविष्य