अग्रलेख
यांना फासावर चढवा!
23 May, 2012 06:05:00 AM
कायदे आणि नियम समाजातील अनैतिक कृत्यांना आळा घालण्यासाठी असतात. परंतु कायदे कागदावरच राहतात आणि माणुसकीला काळिमा फासणारे लोक बिनधास्तपणे बेकायदेशीर कामे करताना दिसतात. वास्तविक पाहता आपल्याकडे गर्भलिंग चिकित्सेसाठी कायद्याने बंदी आहे. तरीही उच्चविद्याविभूषित डॉक्टर्स पैशाच्या हव्यासापोटी गर्भलिंग निदान करतातच. पण त्याही पुढे जाऊन मुलीचा गर्भ पाडण्याचे पापही करतात. बीड जिल्ह्यातील डॉ. सुदाम मुंडे आणि डॉ. सरस्वती मुंडे या दाम्पत्याने तर गर्भाच्या विल्हेवाटीची कटकट नको म्हणून चक्क चार कुत्रे पाळले होते. त्या तगडय़ा कुत्र्यांसमोर रोज गर्भ फेकले जायचे. ज्या परळी गावात मुंडे डॉक्टर हे नीचकृत्य करायचे ते गाव बारा ज्योर्तिलिंगांपैकी वैजनाथाचे स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु डॉ. मुंडेमुळे त्याच वैजनाथाच्या परळीची गर्भलिंग चिकित्सेसाठी बदनामी होणे दुर्दैवाचे आहे.
सारस्वतांची जत्रा
22 May, 2012 06:05:00 AM साहित्य संमेलन हा सध्या भोजनभाऊंचा इव्हेंट ठरतो आहे. त्यातला डामडौल आणि भोजनावळी याचीच जास्त चर्चा होताना दिसते. चंद्रपूरला झालेले संमेलन यास काही प्रमाणात अपवाद ठरले होते. चिपळूणच्या संमेलनाने त्याची पुढची पायरी गाठावी आणि सर्वसामान्य माणसांची साहित्याशी तुटलेली नाळ पुन्हा जोडायचा प्रयत्न या संमेलनात व्हावा....जिगरबाज मावळे
21 May, 2012 06:05:00 AM एव्हरेस्ट शिखरावर बारा मराठी शिलेदारांनी झेंडा रोवून महाराष्ट्राची मान उंचावली आहे. नैसर्गिक आणि मानवनिर्मित अशी अनेक संकटे येऊनही मनोधैर्य खचू न देता त्यांनी पूर्णत्वास नेलेली ही मोहीम राज्याला ललामभूत आहे. ...मुजोराला लगाम
19 May, 2012 06:05:00 AM वानखेडे स्टेडियमवर शाहरूख खानने जो गोंधळ घातला, त्याचे आता कवित्व सुरू झाले आहे. ते आणखी काही दिवस असेच सुरू राहील आणि मग काहीच झाले नाही अशा थाटात परिस्थिती मूळ पदावर येईल. पण काल-परवाच उघडकीस आलेले मॅच फिक्सिंग, महिलेचा विनयभंग आणि आता शाहरूखचा धिंगाणा..आयपीएलच्या ‘कारनाम्यां’ची ही मालिका अशीच सुरू राहिली तर आयपीएल गावगुंडांचे मैदान व्हायला वेळ लागणार नाही!...नव्या पर्वाची सुरूवात
18 May, 2012 06:05:00 AM दर्जेदार शाळांमधून आर्थिक मागासांच्या पाल्यांनाही मोफत प्रवेश देण्याचा किंवा आर्थिक मागासांसाठी देण्यात येणा-या सवलतीसाठी पालकांच्या उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ करण्याच्या सरकारच्या निर्णयांमुळे राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. सरकारचे हे निर्णय कौतुकास्पदच आहेत. या निर्णयांमुळे राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याच्या अंधारवाटा ज्ञानाच्या तेजाने उजळून निघतील यात शंका नाही. मात्र त्याच वेळी आर्थिकदृष्ट्या सबल आणि दुर्बल घटकातली मुले एकत्र शिकल्याने सामाजिक समरसतेस धोका पोहोचण्याची व्यक्त केली जाणारी भीतीही लक्षात घेण्याची गरज आहे. शैक्षणिक भेदभाव संपवताना आर्थिक भेदाची दरी त्यांच्यात निर्माण होणार नाही याची दक्षता शाळांनी घेतली पाहिजे....संकट दुधाच्या महापुराचे
17 May, 2012 06:05:00 AM दुधाचे उत्पादन वाढले तरी ते संकट वाटावे हे आपल्या नियोजनाचे अपयश आहे. दुधाचे संकलन वाढले आणि दुधाच्या भुकटीच्या निर्यातीवर केंद्राने बंदी घातल्याने सरकारपुढे दुहेरी संकट उभे ठाकले आहे. त्यावर उपाय म्हणून शिलकी साठ्यातली 15 टन भुकटी केंद्राने खरेदी करावी, असे सरकारकडून सुचविण्यात आले आहे. ते करतानाच दुधाच्या दरात काही प्रमाणात कपात करून संकटाचे संधीत रूपांतर करणे सरकारला शक्य होते. दुधाच्या दरात कपात करून सामान्यांना दिलासा देण्याचा विचार सरकारने करावयास हवा होता. त्यामुळे दुधाचा खपही वाढला असता. मात्र ते न केल्याने संकलनात वाढ होऊनही चढय़ा दराने दूध घेण्याशिवाय सामान्यांना पर्याय उरला नाही....पुन्हा एकदा फिक्सिंग
16 May, 2012 06:05:00 AM आयपीएलमधील गडगंज आणि अनाठायी पैशाविषयी अनेक थरांवर चिंता व्यक्त झाली होती. आयपीएलमधून होणारा खेळाचा किंवा क्रिकेटपटूचा विकास नैसर्गिक (ऑरगॅनिक) नाही, हा प्रमुख आक्षेप होता. आता ‘इंडिया टीव्ही’च्या ‘स्टिंग ऑपरेशन’मुळे आयपीएलच्या विरोधकांना बळच मिळणार आहे. बीसीसीआयने कारवाई केली पण ती पुरेशी नाही. फ्रँचायझींनीही याबाबत काही तरी ठोस उपाय केले पाहिजेत आणि क्रिकेटशी बांधिलकी दाखवली पाहिजे. पण हे होईल असे वाटत नाही. कारण गेल्या पाच वर्षात क्रिकेट सोडून बाकीच्या गोष्टींनाच अवास्तव महत्त्व आलेले आहे. जन्टलमेन्स गेम म्हणवल्या जाणा-या क्रिकेटचे असे फिक्सिंग त्याच्या मुळावरच उठले आहे....बंडोबा अखेर थंडोबा
15 May, 2012 06:05:00 AM पेशवाईच्या काळामध्ये सरदार आणि सुभेदार आपापल्या प्रांतात मनमानी कारभार करीत असत.त्या सरदारांना आवरणे हेच पेशव्यांसाठी मोठे काम होऊन बसले होते. अगदी तशीच स्थिती सध्या भारतीय जनता पक्षात आहे. पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांचा दुस-यांदा ‘राज्यारोहण’ समारंभ ऐन तोंडावर आला असताना प्रथम राजस्थानच्या वसुंधरा राजे शिंदे आणि त्यापाठोपाठ कर्नाटकाचे येडियुरप्पा यांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या येडियुरप्पा यांनी सुरू केलेले हे नाटक कर्नाटकातील भाजपाच्या संपूर्ण नाशाची नांदी आहे....लोकशाहीची साठी
14 May, 2012 06:05:00 AM स्वातंत्र्यानंतर आपण संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला. त्याला काल साठ वर्षे पूर्ण झाली. या काळात लोकशाही बळकट होत असताना लोकप्रतिनिधींच्या असंसदीय वागणुकीचे ग्रहण तिला लागू नये याची काळजी घेण्याची गरज आहे. ...जाचक करवाढ
12 May, 2012 06:30:00 AM महापालिका निवडणुकीपूर्वी विविध सुखसोयींचे गाजर दाखवणा-या शिवसेना-भाजप युतीने कंबरडे मोडणा-या करवाढी लादून सामान्य मुंबईकरांचे जिणे कठीण करून टाकले आहे. नागरिकांनी विनातक्रार कर भरावेत अशी अपेक्षा ठेवणारी मुंबई महापालिका रस्ते, पाणी आणि वीज या प्राथमिक सुविधा पुरविण्याबाबतही बेपवाई दाखवते....मोस्ट कमेंटेड















































































































राशीभविष्य