पहिले पान | प्रहार ब्लॉग | गुगलचे नवे ऑनलाइन न्यूज रीडर

गुगलचे नवे ऑनलाइन न्यूज रीडर

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

गुगलने फास्ट फ्लिप या न्यूज रीडरमध्ये राजकारण, अर्थजगत, क्रिडा, विज्ञान-तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य, पर्यटन, अग्रलेख अशा विभागात वर्गीकरण केले आहे. बीबीसी, न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, फॉरेन पॉलिसी, बिझनेस विक, न्यूजवीक, नॅशनल रिव्ह्यू ऑनलाइन या वृत्तपत्राबरोबरच अटलांटिक, बिझनेस वीक, कॉस्मोपॉलिटन, एले, मॅरी क्लेरी आदी मासिकांमधील लेख गुगलने फास्ट फ्लिपवर उपलब्ध करुन दिले आहेत.

माध्यमे ऑनलाइन झाली असली तरी या ऑनलाइन माध्यमामधील एखादा मजकूर शोधून काढण्यासाठी बराच वेळ सर्च करावे लागते. जगातील काही महत्वाच्या वृत्तपत्रामध्ये आपल्या विषयाशी संबंधीत लेख अथवा वृत्त वाचायचे असेल तर त्या वृत्तपत्राच्या इंटरनेट आवृत्तीवर जाऊन शोधण्याचे काम करावे लागते. जगातील अनेक ऑनलाइन वाचकांच्या या सर्च करण्याचा त्रास आणि वेळ वाचवण्याचे काम गुगलच्या फास्ट फ्लिपने केले आहे. 

गुगलमार्फत एकापेक्षा एक अशी नवनवीन संपल्पनाची निर्मिती करणा-या गुगल लॅबने गुगल फास्ट फ्लिप हे ऑनलाइन न्यूज रीडर आणले आहे. या ऑनलाइन न्यूज रीडरच्या माध्यमातून वाचक जगातील दर्जेदार वृत्तपत्रांमधील लेख, वृत्त सहज आणि सोप्या पद्धतीने वाचू शकतात. फास्ट फ्लिपवर केवळ वृत्तपत्रे नव्हे तर जगातिल सर्वोत्तम मासिके वाचण्यास मिळणार आहेत. गुगलने या फास्ट फ्लिपमध्ये राजकारण, अर्थजगत, क्रिडा, विज्ञान-तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य, पर्यटन, अग्रलेख अशा विभागात वर्गीकरण केले आहे.  बीबीसी, न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, फॉरेन पॉलिसी, बिझनेस विक, न्यूजवीक, नॅशनल रिव्ह्यू ऑनलाइन या वृत्तपत्राबरोबरच अटलांटिक, बिझनेस वीक, कॉस्मोपॉलिटन, एले, मॅरी क्लेरी आदी मासिकांमधील लेख गुगलने फास्ट फ्लिपवर उपलब्ध करुन दिले आहेत. सध्या एकूण ३९ वृत्तपत्रे आणि मासिकांचा या न्यूज रीडरमध्ये समावेश आहे.  

नेटविश्वातील नवनवीन शोधांबरोबरच यूझर फेंडली गोष्टींची निर्मिती करण्यात गुगल कायम पुढे आहे. फास्ट फ्लिप या न्यूज रीडरची मांडणी आणि अतिशय सुटसुटीत असल्यमुळे प्रत्यक्षात वृत्तपत्र वाचण्याचा अनुभव या न्यूज रीडरमधून मिळतो. विषयानुसार मांडणी केल्यामुळे वाचकांना हवी असणारी माहिती सहज उपलब्ध होते. सध्या तरी अमेरिकेतील वृत्तपत्रे आणि मासिके यांच्या फास्ट फ्लिपवर समावेश असला आहे. मात्र भविष्यात जगातिल अन्य देशातील वृत्तपत्रे आणि मासिकाचा यामध्ये समावेश होणार आहे.

गुगलच्या नव्या फास्ट फ्लिप जाण्यासाठी क्लिक करा- http://fastflip.googlelabs.com/

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (5 पोस्टेड ):

rohan on 12 October, 2009 11:06:11 AM
avatar
the information given on the blog is really helpfull and i thankful to team of prahaar for providing regular helpful informaiton on its site. The topics that u cover were burning and contravercial too, but the presentation has been improoved lot better than the previous one.

i wish all the very best to all of you for your honest and responsible work.

Happy Diwali
To Prahaar Team.
tejasvi bamane on 12 October, 2009 01:03:55 PM
avatar
आभार ! आम्हाला इतकी छान माहिती दिल्याबद्दल, आजकालचा युगात याची फार गरज आहे,जगातील सर्व माहिती एकत्र मिळणार आहे ही किती चांगली गोष्ट आहे त्याबद्दल आभारी आहोत.
shital utture on 24 October, 2009 07:35:09 PM
avatar
गूगल ने kelela हा prayatna nakkicch vakhannya joga aahe.

tari asha nayva mahiti baddal prahaar che abhinandan.

bhavishyat amhala thodya scince related kaahi mahiti milali tar nakki update kara ही vinanti.
on 24 October, 2009 08:28:54 PM
avatar
आपकी ये सुविधा बहोत ही अची और लाजवाब है. आपको बहोत बहोत बधाई. ...........समाधान हेंद्रे, सतारा.
Mrs.Smita Santosh Chaugale on 27 October, 2009 02:28:24 PM
avatar
आभार ! आम्हाला इतकी छान माहिती दिल्याबद्दल

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
4.86