पहिले पान | प्रहार ब्लॉग | तोंडातलं पाणी पळतंय का?

तोंडातलं पाणी पळतंय का?

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

खरं तर मुंबई, उपनगरांमध्ये आठवडय़ात एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतल्याने मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अर्थात मुंबईकरांच्या नशिबी हे आजच होतंय असं नाहीय. त्यांना अ‍ॅडजेस्ट करायची जणू सवय लागली आहे.

हल्ली सगळाच गोंधळ उडालेला दिसतोय. कुणाला कधी पाणी पाजलं जाईल, याचा काही नेम नाही. टाटाने घराघरात शुद्ध पाणी पोहोचवण्याचा विडा उचलला आहे. तर म्हाडाच्या नव्या सोडतीत घरांना पाणी मिळेलच, असा दावा म्हाडा अध्यक्षांनी केलाय खरा, पण तोपर्यंत त्या घरात विसावणा-या जीवांना पाणी कुठून चोरायचं हा प्रश्न सतावणार आहे.

खरं तर मुंबई, उपनगरांमध्ये आठवडय़ात एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतल्याने मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. अर्थात मुंबईकरांच्या नशिबी हे आजच होतंय असं नाहीय. त्यांना अ‍ॅडजेस्ट करायची जणू सवय लागली आहे. लोकलच्या प्रवासात फोर्थ सीटवर बसणा-या मुंबईकराला जागेची टंचाई काय असते, हे चांगलं ठावूक असतं. त्यामुळेच येथे येणारा प्रत्येक माणूस मुंबईकराचा यथेच्छ फायदा उठवतो. झोपडपट्टीवाल्यांना वीज-पाणी पुरवतो कोण? त्यांच्याकडून महसूल (?) गोळा करतंय कोण? याची अनेक वेळा उघड चर्चा होऊनही मूळ प्रश्नांना बगल देण्याचे राजकीय डावपेच सक्सेस झालेयत. सध्या हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे. तिथेही पाण्याला आग लावणारी राजकीय नेतेमंडळी बाह्या सरसावून बसली आहेत. त्यांच्या टेबलावर बिसलेरीच्या बाटल्या ठाण मांडून बसलेल्या असतात. त्यातला एकेक घोट रिचवत ते पाणी प्रश्न विधानसभेत मांडणारच.

सत्ताधारी पक्षापेक्षा नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे काय काय प्रश्न पेटवतात, याकडे तमाम जनतेचं लक्ष लागलं आहे. तशी जनता आभाळाकडे दररोज पाहत असते. कारण हवामानाचा अंदाज वेधशाळेने कितीही वर्तवला तरी त्यातही फिक्सिंग होत असल्याचं आपण अनुभवलं आहे. तर म्हणायचं असं आहे की, पाणी.. पाणी करणारे आपण पाण्याबद्दल किती गांभीर्याने विचार करतो आहोत? सगळेच राजकीय नेते आश्वासन देऊन तोंडाला पाने पुसतात. पण म्हणून काय आपण आपलं तोंड रुमालाने पुसायचं नाही का? पाण्याच्या गोष्टीची सुरुवात झालीय खरी, तुम्ही मात्र उत्तम आरोग्यासाठी पाणी भरपूर प्या.. काय?

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (3 पोस्टेड ):

sunil sakpal on 08 December, 2009 04:20:11 PM
avatar
Good.....Lage Raho
Vachak on 08 December, 2009 09:54:49 PM
avatar
शेवटी सगळे काही पाण्यातच!
umesh on 13 December, 2009 03:25:20 PM
avatar
सरकारने पावूस पडण्याचे तंत्र विकशित करावे जसे टेस्ट टुब बेबी बनवतात तसे. आन्दोलन करत्यानी आभालात जावून ढगाला शिफारस करावी की पानी पाठवू नए कारन लोकांच्या तोंडाचे पानी पालाले तरच मोर्चा कदाता येईल नाहीतर आमचे तोंडाचे पानी पलेल.

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0