पहिले पान | प्रहार ब्लॉग | फिरता विक्रेता

फिरता विक्रेता

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

‘ग्राहक कौशल्ये’ ही नेहमी एकाच प्रकारची असत नाहीत. उदाहरणार्थ साडी खरेदीसाठी लागणारे कौशल्य व विम्याची पॉलिसी घेण्यासाठी करावा लागणारा गृहपाठ यामध्ये फरक असणारच. आज आपण अशा अनेक वस्तू व सेवा खरेदी करतो, की ज्यांच्याबद्दल एकाच व्यक्तीला सर्व माहिती असणे कठीण असते.

बदलत्या काळाबरोबर आपली जीवनशैलीसुद्धा बदलत जाते. त्या शैलीला साजेशी भाषा आणि इतर व्यवहार समाजात नव्याने येतात, रुजतात, वाढतात. हे असे चक्र हळूहळू, पण नियमितपणे फिरते. मग दहा वर्षामागे आपण कसे होतो. कुठे होतो, आज काय परिस्थिती आहे. असा आढावा अनेक अंगांनी घेतला जातो.

 

ग्राहकत्वाची परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळेच ग्राहक कौशल्येही नेहमी एकाच प्रकारची असत नाहीत. उदाहरणार्थ साडी खरेदीसाठी लागणारे कौशल्य व विम्याची पॉलिसी घेण्यासाठी करावा लागणारा गृहपाठ यामध्ये फरक असणारच. आज आपण अशा अनेक वस्तू व सेवा खरेदी करतो, की ज्यांच्याबद्दल एकाच व्यक्तीला सर्व माहिती असणे कठीण असते. इंटरनेटवरुन जरी अनंत विषयांची माहिती उपलब्ध असली तरी तिचा उपयोग करून खरेदीचा जागरूक निर्णयघेण्याची क्षमता सर्व सामान्य ग्राहकांकडे असेलच असे नाही. अशावेळी मग त्या-त्या विषयाच्या अभ्यासक अशा सल्लागाराची मदत घेतली जाते. अनेकदा असा सल्ला हा फीमोजून, म्हणजेच व्यावसायिक सल्लागाराकडून घेतला जातो. त्या वेळी आपण त्या सल्लागाराचे ही ग्राहक ठरतो. मात्र ब-याच वेळा विक्रेताच सल्लागाराची भूमिका घेतो. त्या वेळी त्याला त्याची वस्तू किंवा सेवा विकायची असते. त्यामुळे तो त्या वस्तूचे गुण आणि तिची किंमत याविषयी ग्राहकाला भरपूर माहिती पुरवतो. आजकाल निरनिराळय़ा योजनांद्वारे आणि दारोदार फिरून ही अनेक किंमती वस्तूसुद्धा विकल्या जातात. उदा. पावसाळा जवळ आला की वॉटर फिल्टरची विक्री आक्रमकपणे सुरू होते. टीव्हीवरून विविध प्रकारच्या वॉटर फिल्टरच्या जाहिराती तर येतच असतात. पाणी शुद्ध करण्याच्या विविध शास्त्रीय प्रणालींची फक्त नावे त्यामुळे सामान्य ग्राहकाला कळतात. डॉक्टरचा वेष घातलेला कलाकारवॉटर फिल्टरची महती सांगतो. ब-याच वेळा अशा जाहिरातीमधलाच वॉटर फिल्टर विकायला आपल्या दाराशी एखादा टाय लावलेला स्मार्ट विक्रेता येऊन उभा राहतो.

 

गृहिणीला वाटते की कालच जान्यामान्या अभिनेत्रीची जाहिरात टीव्ही वर पाहिली आणि तस्साच वॉटर फिल्टर दाराशी चालून आलाय. सुश्मिताचेसुद्धा असेच झाले. त्यात मेमहिन्यात तिच्या मुलाचे पोट बिघडले होते. त्याचे कारण पाणीअसावे, असा एक अंदाज होता. पावसाळा आणि शाळा दोन्ही एकदम सुरू होणार. त्यामुळे शुद्ध पाण्याची हमी देणारा वॉटर फिल्टर घेण्यासाठी सुश्मिताने सात हजार रुपयांचा चेक विक्रेत्याच्या हवाली केला. रीतसर पावती घेतली. चेक वटला की नवा वॉटर फिल्टर बसवला जाईल,’ असे सांगून स्मार्ट विक्रेता चेक घेऊन गेला. आठ दिवस झाले, बॅँकेतून पासबुक भरून आणले. चेक तर खात्यातून तिस-याच दिवशी गेला. आता सुश्मिताची घालमेल सुरू झाली. नावांजलेल्या कंपनीकडून तिची ही अपेक्षा नव्हती. पाऊस सुरू झाला होता. तिने पाणी गॅसवर उकळायला सुरुवात केली आणि पावतीवरच्या आफिसमध्ये फोनवर फोन करायला लागली.

 

पण दरवेळी तिचा स्मार्ट विक्रेता मि. रमेश अर्थातच बाहेर असायचा. मग ती त्या ऑफिसात जाऊन धडकलीच. तर ते अगदी छोटेसे होते व मोठ्या कंपनीसाठी ऑर्डर्स गोळा करणे एवढेच त्यांचे काम होते. पुरवठा करणारी बडी कंपनी व तिचे ऑफिस यांच्याकडे या ऑर्डर्स पाठवायच्या आणि स्वत:चे कमिशन घ्यायचे, असा त्यांचा व्यवसाय! जुलै अर्धा झाला आणि अखेर सुश्मिताचा मूळ कंपनीच्या ग्राहक कक्षाशी संपर्क झाला. ऑर्डर खूपच आल्यामुळे वॉटर फिल्टरच्या पुरवठ्यात वेळ लागत आहे, याबद्दल कंपनीने दिलगिरी व्यक्त केली. शिवाय वॉटर फिल्टर नक्की कधी देता येईल, हे सांगितलेच नाही.

 

आता मात्र सुश्मिता खरी भडकली आणि मुंबई ग्राहक पंचायतीच्या तक्रार मार्गदर्शन केंद्रात आली. तिला आता तो वॉटर फिल्टर नकोच होता. अर्धा पावसाळा उलटला आणि कधी देणार तेही सांगत नाहीत. मला पैसेच परत हवेत,’ असे तिने सांगितले. कार्यकर्त्यांनी तिची कैफियत शांतपणे ऐकून घेतली. तिच्याकडच्या पावत्या व बँकेचे पासबुक पाहून तक्रारीच्या खरेपणाची खात्री केली. त्यानंतर सुश्मिताने मार्गदर्शकांच्या सांगण्याप्रमाणे पत्रव्यवहार केला, स्मरणपत्रेही पाठवली. अखेरीस कंपनीने तिची सर्व रक्कम अधिक बचत खात्याच्या दराप्रमाणे तीन महिन्यांचे व्याज असा चेक तिला दिला.

 

दारावरचा विक्रेता किंवा ज्याला मल्टीलेव्हल मार्केटिंग किंवा साखळी पद्धत म्हणतात अशा विक्रेत्यांकडून खरेदी करतानासुद्धा योग्य ती काळजी घेणे, पावती घेणे, फोन नंबर, नाव इत्यादीची शहानिशा करणे आवश्यक आहे. जर सुश्मितासारखा अनुभव आला तर या पुराव्यांचा उपयोग होतो.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0