पहिले पान | प्रहार ब्लॉग | कुडबुड्यांच्या हाती आपले जीवनमार्ग!

कुडबुड्यांच्या हाती आपले जीवनमार्ग!

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

मनाची द्विधावस्था असेल किंवा ‘काय होणार?’ याबद्दल खात्री नसेल, तर हिंदू लोक ‘गुरूं’कडे जातात. हे गुरू म्हणजे स्वामी, सिद्धपुरुष, बाबा, महाराज.. किंवा ज्योतिषविशारद असे कुणीही असू शकतात. हिंदूंचं एक बरंय की, त्यांना हे कृत्य धर्माच्या कसोटीवर किती कसाचं ठरेल, याबद्दल फार प्रश्न पडत नसावेत.. सीएची परीक्षा देऊ इच्छिणा-या मुलाचे पालक, बँकेत जॉब बघणारी तरुणी, लोन घेऊ पाहणारा स्वेच्छानिवृत्त गृहस्थ या सर्वाना ‘माझं काय होईल?’ किंवा ‘हे मला ‘लाभेल’ का?’ अशा स्वरूपाच्या प्रश्नांचीच उत्तरं त्यांच्या धर्मात सन्माननीय ठरू शकणा-या माणसांकडून किंवा हिंदूधर्मीय ज्याला ‘शास्त्र’च मानतात अशा एखाद्या गणन-अनुमान-अंदाज-सल्ला व्यवस्थेकडून (ज्योतिष) हवी असण्याची शक्यता अधिक.

आमचा मुलगा चार्टर्ड अकौन्टन्सीची प्रवेश परीक्षा देतोय

 

 मी सध्या प्रायव्हेट कंपनीत जॉब करतेय. बँकेतली नोकरी बघतेय

 

मला नवा प्लॉट घ्यायचाय, 15 लाखांपर्यंत आमची तयारी आहे.. पुढल्या रकमेसाठी थोडं लोन घ्यावं लागेल

 

या सा-या सिच्युएशन्स, गेल्या 25 ते 30 वर्षात समाजातल्या शेकडोंच्या अनुभवातल्या. अशा वेळी तुम्ही काय करता? मनाची द्विधावस्था असेल किंवा काय होणार?’ याबद्दल खात्री नसेल, तर हिंदू लोक गुरूंकडे जातात. हे गुरू म्हणजे स्वामी, सिद्धपुरुष, बाबा, महाराज.. किंवा ज्योतिषविशारद असे कुणीही असू शकतात. हिंदूंचं एक बरंय की, त्यांना हे कृत्य धर्माच्या कसोटीवर किती कसाचं ठरेल, याबद्दल फार प्रश्न पडत नसावेत.. सीएची परीक्षा देऊ इच्छिणा-या मुलाचे पालक, बँकेत जॉब बघणारी तरुणी, लोन घेऊ पाहणारा स्वेच्छानिवृत्त गृहस्थ या सर्वाना माझं काय होईल?’ किंवा हे मला लाभेलका?’ अशा स्वरूपाच्या प्रश्नांचीच उत्तरं त्यांच्या धर्मात सन्माननीय ठरू शकणा-या माणसांकडून किंवा हिंदूधर्मीय ज्याला शास्त्रच मानतात अशा एखाद्या गणन-अनुमान-अंदाज-सल्ला व्यवस्थेकडून (ज्योतिष) हवी असण्याची शक्यता अधिक.

 

हेच तिघेहीजण जर शीख असतील, आणि त्यांनाही समजा माझं काय होणार?’, ‘होईल ना सगळं नीट?’ असे प्रश्न पडलेच, तर त्या धर्मात सन्माननीय मानल्या जाणा-या ग्रंथीकडे जाऊन, ग्रंथसाहेबाचं पान उलटून त्या पानाचा कौल घेण्याची व्यवस्था या धर्मात आहे.

 

हेच तिघेहीजण जर ख्रिस्ती असतील, तर आपापल्या गॉडफादरपासून पॅरिशमधल्या ओळखीच्या वा कृपादृष्टी ठेवणा-या सिस्टर, ब्रदर वा फादपर्यंत कुणाकुणाला स्वत:साठी प्रे करायला सांगतील. सल्ला घेतील, तो मनातली भीती जावी म्हणून.

 

हेच तिघेजण जर मुस्लिम असतील, तर त्यांना स्वत:बद्दलचे- उत्कंठायुक्त भीतीचे प्रश्नच पडणार नाहीत, असं मानायचं का? त्यांना याच सगळ्या सिच्युएशन्समध्ये, फक्त हे माझ्या धर्मानुसार आहे की नाही?’ एवढा एकच प्रश्न पडेल?

 

म्हणजे, ‘चार्टर्ड अकौन्टंट होणं इस्लामला मान्य आहे?’ किंवा लोन घेणं, ते फेडताना व्याजही देणं कुराण आणि हदीसनुसार योग्य ठरेल?’ किंवा, ‘बँका व्याज घेतात, मग मी मुस्लिम असल्यानं तिथल्या नोक-यांवर बहिष्कारच टाकावा काय?’

 

असे प्रश्न एकेकट्या गरजूला पडतील का?

 

बरं, हे तिघेजण काही तथाकथित- मदरशांत शिकून दहशतवादी होणारे धर्माधनाहियेत.. त्यांना आपापली आयुष्य आहेत, शिक्षण- नोकरी- रिटायरमेंट प्लानिंगसारखे व्याप आहेत.. म्हणजे तेही चारचौघांसारखेच आहेत.

 

तरीही मुस्लिमांकडून हे अस्सेच प्रश्न दारुल उलूम देवबंदच्या http://www.darululoom-deoband.com या वेबसाइटवर फतवा ऑनलाइनच्या http://darulifta-deoband.org या धर्मसल्ला आणि फतवा यांना वाहिलेल्या लिंकवर जाऊन विचारले जातात, हे तुम्हाला खरं वाटतंय?

 

हे खरं आहे! एक मुफ्ती, दोन नायब मुफ्ती आणि दोन असिस्टंट मुफ्ती (मुफ्ती म्हणजे सुन्नींचा धर्मसल्लागार- शरियाचा भाष्यकार) असे पाचजण या दारुल इफ्म्तासाठी फतवे काढण्याचं काम करतात. दारुल इफ्म्ताच्या या वेबसाइटची कन्टेन्ट मॅनेजमेंट चौघे मौलवीच पाहतात.. त्याखेरीज साइट डेव्हलपर, डिझायनर आदी टेक्निकल मंडळी. म्हणजे, पाच मुफ्ती आणि चार मौलवी हे भारतातल्या (किंवा शेजारी देशांतल्याही) सर्व मुस्लिमांना जीवनमार्ग दाखवू शकतात.. म्हणजे धर्म आणि अधर्म, हे फक्त पाचजण ठरवू शकतात, असंच ना?

 

धर्माच्या क्षेत्रातल्या सन्माननीय व्यक्तींचा भावनिक- मानीव आधार तर हिंदू, शीख, खिस्ती आदी कोणत्याही धर्मात असू शकतोच. या सन्माननीय व्यक्ती म्हणजे जणू धर्माचे दलाल आहेत आणि त्यांच्याकडून आपल्या आयुष्यांना धर्माची झळाळी देणं, त्या झळाळीचं- किंवा धर्मतेजाचं- समाधान मिळवणं आपल्याला सोपं पडतं, अशी खात्री असलेलेच लोक आपापल्या धर्मातल्या सन्माननीय व्यक्तींचा मान अधिकाधिक वाढवत असतात.

 

तर, ‘दारुल उलूमच्या पाच मुफ्तींनी गेल्या पाचसहा वर्षात तब्बल 7670 उर्दू आणि 3722 हून अधिक इंग्रजी फतवे काढले! म्हणजे केलं काय? तर हे धर्माला मान्य आहे की नाही?’ वा यावर धर्मग्रंथ, त्यांतले यमनियम काय सांगतात?’ या प्रश्नांवर फक्त उत्तरं दिली!

 

पण ही उत्तरं म्हणजेच फतवे, असा प्रचार पद्धतशीरपणे गेल्या पाच वर्षात दारुल उलूम देवबंदनं केला. या फतव्यांना कुणी फार आव्हान देऊ नये, अशा दोन पळवाटादेखील दारुल उलूम देवबंदनं ठेवल्या आहेत. एक : दारुल इफ्ताच्या वेबसाइटचा प्रत्यक्ष उलूमशी संबंध नसल्याचं या वेबसाइटवर म्हटलंय; तर दुसरी पळवाट: प्रत्येक ऑनलाइन फतव्याखाली अल्ला अधिक चांगले (उत्तर) जाणतोअशा वाक्याची पाचरही मारली. यापैकी काही ऑनलाइन फतवे :

 

तुझ्या मुलाला सीए होऊदे, पण व्याजाच्या व्यवहारांशी त्याचा संबंध कधीही यायला नको’ (फतवा क्र. 19748)

 

किंवा, ‘बँकेत काम कर, पण व्याज कॅल्क्युलेट करण्याच्या कामापासून दूर राहा’ (फतवा क्र. 21153)

 

किंवा, ‘होम लोन नकोच.. जर एक टक्का व्याजानं मिळालं तरच घ्या’ (फतवा क्र. 19536)

 

असले सल्ले या पाचजणांनी दिलेत.

 

कोणता पोषाख इस्लामी? शर्टपँट? सलवार-कमीज? कुर्ता-पायजमा? झब्बा?’ या प्रश्नावर तर या पाच मुफ्तींचं उत्तर मासलेवाईक आहे कुर्ता-पायजमा इस्लामी, पण सलवार-कमीज नव्हे! शर्टपँट घालणं भारतात रूढ असल्याने ते इस्लामविरोधी ठरत नाही, पण झब्बा उत्तम!’ (फतवा क्र. 21013)

 

अशी कुडबुड्यांसारखी उत्तरं देणा-या लोकांनीच चार एप्रिल 2010 रोजी, ‘फतवा क्र. 21031काढला! मुस्लिम महिलांनी सरकारी नोक-या वा खासगी कचे-यांत काम करू नये; कारण पुरुष सहका-यांसमोर बुरख्याविना वावरणे इस्लामविरोधी आहेअसा तो फतवा.. महिलांची बौद्धिक क्रयशक्तीच नाकारणा-या या फतव्याला इस्लाममधून आणि बाहेरून विरोध होतो आहे. या विरोधकांपैकी जावेद अख्म्तरना मिळालेली हत्येची धमकी खरी की खोटी, याची चर्चा व्यर्थ आहे. पण त्या निमित्तानं, आपण आपले जीवनमार्ग कुडबुड्यांच्या हाती सोपवतो आहोत का, आणि का सोपवतो आहोत, हा प्रश्न कोणताही धर्म मानणा-यांनी स्वत:ला विचारून पाहावा.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (1 पोस्टेड ):

shrinivas agawane on 26 May, 2010 06:19:08 PM
avatar
१.आपणच आपल्या भितितुन जन्माला घातले हे सर्व धर्म . अणि हे फार पूर्वी पासून नैसर्गिक रित्या चालत आलय.ते मान्य केले पाहिजे . आता त्याचे प्रकार वाढलेत.अणि आपले जग जवळ आल्याने सर्वांचे सर्वांना कलू लागले. नाहीतर ह्या पेक्षाही भयानक चालीरीती अस्तिव्तात आहेत अणि ते एकाच्या डोक्यातून आलेल्या आहेत.
२.प्रत्येक धर्मत - देशात बायकांना फार काही सन्माननीय वागणूक नहीं. भारतामधाली राष्ट्रपति,सभापति,पन्तप्रधान स्त्री असली तरी तिथली स्त्री कशी जगते हे प्रत्येकालाच माहित्ये.(लेखाची सुरुवात..घर पतालीतुन सुरु होते, म्हणून !)
३. शेवटचे वाक्य हिन्दुनी खुप नीट वाचायला हवे.कारन मराठी जनानारे बहुसंख्य हिन्दुना हा लेख आपलासा वाटेल अणि हा लेखकाचा पराभव ठरेल .
४. लेखात प्रश्न विचारले असले तरी लेख तम्हाने च वाटला नहीं. छान म्हनू शकतोच .

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0