पहिले पान | प्रहार ब्लॉग | निष्क्रिय सत्ताधारी, आक्रमक विरोधक

निष्क्रिय सत्ताधारी, आक्रमक विरोधक

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font

मुंबई महापालिकेत सत्तेवर असलेली शिवसेना-भाजप युतीची निष्क्रियता दिवसेंदिवस ठळकपणे जाणवू लागली आहे. मुंबईच्या विकासात युतीच्या नेत्यांनी योगदानही देता आलेले नाही. शिवाय मलेरियाच्या साथीवर त्यांना नियंत्रणही ठेवता आलेले नाही. प्रत्येक बाबीमध्ये शिवसेनेला अपयशच येत आहे. आपणच नियुक्त केलेले नेते प्रशासनाच्या ताटाखालची मांजरे बनल्याने खुद्द शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांना रस्त्यावर उतरून महापालिकेच्या कामकाजात लक्ष द्यावं लागतंय.

मुंबई महापालिकेत सत्तेवर असलेली शिवसेना-भाजप युतीची निष्क्रियता दिवसेंदिवस ठळकपणे जाणवू लागली आहे. मुंबईच्या विकासात युतीच्या नेत्यांनी योगदानही देता आलेले नाही. शिवाय मलेरियाच्या साथीवर त्यांना नियंत्रणही ठेवता आलेले नाही. प्रत्येक बाबीमध्ये शिवसेनेला अपयशच येत आहे. आपणच नियुक्त केलेले नेते प्रशासनाच्या ताटाखालची मांजरे बनल्याने खुद्द शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांना रस्त्यावर उतरून महापालिकेच्या कामकाजात लक्ष द्यावं लागतंय. उद्धव ठाकरे यांच्या वारंवार महापालिकेच्या कामकाजातील हस्तक्षेपामुळे महापौर नक्की कोण, हा प्रश्न मुंबईकरांना पडल्यावाचून राहत नाही.

मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची सूत्रे सात महिन्यांपूर्वी हाती घेणा-या श्रद्धा जाधव यांना आपल्या कारकीर्दीत प्रशासनावर अंकुश ठेवता आला नाही. सभागृहनेते म्हणून सुनील प्रभू यांना काही चुणूक दाखवता आलेली नाही. या दोन्ही नेत्यांच्या निष्क्रियतेमुळे उद्धव ठाकरेंना रस्त्यावर उतरावे लागले. दत्ता दळवी, शुभा राऊळ या मागील महापौरांच्या काळात महापौर निवासावर उद्धव ठाकरे यांनी महापालिकेच्या कामकाजाबाबत जेवढ्या बैठका घेतल्या नसतील त्याहून तिपटीने अधिक बैठका श्रद्धा जाधव यांच्या सात महिन्यांच्या कालावधीत घेतल्या. कारण दीड वर्षाने होणा-या मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये अशा नेत्यांवर अवलंबून राहिलो तर हातची महापालिका जाईल, याचा दृष्टान्त उद्धव ठाकरेंना नक्कीच झाला असेल. श्रद्धा जाधव महापौर झाल्यापासून लोकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी दालनात कमी आणि कंत्राटदारांशी बोलण्यासाठी अँटी चेंबरमध्येच जास्त असेच चित्र पाहायला मिळते. तर सभागृहनेते सुनील प्रभू यांनी आपलं दालन तर कंत्राटदारांनाच आंदण दिलंय. ज्या दिवशी कंत्राटदार येणार असतील, त्याच दिवशी प्रभूंचे त्या दालनात आगमन होते. सुधार समितीमध्ये मंजूर झालेले प्रस्ताव सभागृहापुढे तातडीचे कामकाज म्हणून ठेवल्यानंतर महापौरांकडून त्या जागेची पाहणी करण्यामागचा उद्देश काय? यापूर्वी कोणत्याही महापौरांनी अशाप्रकारे वर्तन केलेलं नाही, मग या महापौरांचा हा हट्ट का? मित्र पक्षाचे सदस्य या समितीच्या अध्यक्षपदावर असताना त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास नाही, असे समजायचे का?

विरोधक आक्रमक

मुंबई महापालिकेतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षही सत्ताधारी पक्षाला साथ देत असल्याने महापालिकेत विरोधी पक्ष आहे की नाही, असा सवाल केला जात होता. परंतु जसजशा महापालिकेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत तसतसे विरोधक आक्रमक होऊ लागल्याचे चित्र महापालिकेत दिसू लागले आहे. रस्त्यांच्या कामांसाठी वाढीव खर्चाच्या प्रस्तावांना (व्हेरिएशन) मंजुरी असो, मलेरियाची साथ असो वा आरक्षित भूखंड खासगी विकासकांच्या घशात घालण्याचे प्रयत्न असो. या प्रमुख मुद्दय़ावरून विरोधीपक्षनेते राजहंस सिंह यांनी शिवसेनेच्या तोंडाला फेस आणला आहे. मलेरियाने आज मुंबईत गंभीर स्वरूप धारण केलं आहे. मात्र हीच चिंता सिंह यांनी जूनच्या दुस-याच आठवडय़ामध्ये सभागृहात निवेदनाद्वारे मांडून सत्ताधारी व प्रशासनालाही फैलावर घेतलं होतं. पण त्या वेळी शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी कशाला मलेरियाची चिंता करतात, अजून कोणाला इथे मच्छर चावला नाही. फक्त तुम्हालाच चावलाय वाटतंय असं म्हणत राजहंस सिंह यांची टिंगल केली होती. मात्र त्यांच्या पक्षाचे प्रमुख प्रत्येक रुग्णालयाला भेटी देतात, अधिकाऱ्यांच्या बैठका घेतात. मग आता हा मच्छर उद्धव ठाकरेंना चावलाय असं समजायचं का? की राज ठाकरेंनी मलेरियास मुंबईत सुरू असलेली बांधकामे व परप्रांतीयच जबाबदार असल्याने शिवसेनेला या मलेरियाची लागण झाली? खरं तर विरोधी पक्षनेते आक्रमक झाले, हे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शुभशकून आहे. सत्ताधारी पक्षाचे नेते हे पैशाच्या मागे धावत आहेत, मात्र काँग्रेससह विरोधी पक्षाचे नेते विकासकामांच्या मागे धावताना दिसतात. त्यामुळेच लोकसभा असो वा विधानसभा या निवडणुकांमध्ये मुंबईकरांनी शिवसेनेला त्यांची जागा दाखवत काँग्रेसवर विश्वास दाखवला. त्यामुळेच आगामी निवडणुकीनंतर आपली सत्ता येणार नाही, या एकाच विचाराने महापालिकेची तिजोरी लुटण्याचा एकमेव कार्यक्रम शिवसेना-भाजप युतीकडून चाललाय असेच वाटते.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0