पहिले पान | प्रहार ब्लॉग | घातक कच-याचा प्रश्न अनुत्तरित

घातक कच-याचा प्रश्न अनुत्तरित

फॉन्ट साईज Decrease font Enlarge font
Facebook this storyFacebook this story

भोपाळमधली युनियन कार्बाइड कंपनीतून झालेली वायुगळतीची दुर्घटना तुमच्या लक्षात असेलच. तीन डिसेंबर 1984 ला रात्री बाराच्या सुमारास वायुगळतीला सुरुवात झाली आणि सकाळपर्यंत तीन हजारांवर माणसे मृत्युमुखी पडली.

भोपाळमधली युनियन कार्बाइड कंपनीतून झालेली वायुगळतीची दुर्घटना तुमच्या लक्षात असेलच. तीन डिसेंबर 1984 ला रात्री बाराच्या सुमारास वायुगळतीला सुरुवात झाली आणि सकाळपर्यंत तीन हजारांवर माणसे मृत्युमुखी पडली. मृतांचा हा आकडा वाढत दुस-या-तिस-या दिवशीच वीस हजारांच्या आसपास पोहोचला होता. आज मध्येच या घटनेला उजाळा देण्यामागचे कारणही तुमच्या लक्षात आले असेलच, युनियन कार्बाइडचा विषारी घनकचरा नवी मुंबईतील तळोज्यात आणला जाणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली चर्चा.

 

युनियन कार्बाइड कंपनीतील वायुगळतीने पहिली धोक्याची सूचना दिली होती, ती 1981 च्या डिसेंबरमध्ये. या कारखान्यात काम करणारा अश्रफ मोहंमद द्रवरूप फॉसिजिनमुळे मरण पावला होता. तिथल्या एका मुक्त पत्रकाराने याचा छडा लावण्याचा प्रयत्न केला असता, त्याला हा वायू पहिल्या महायुद्धात जर्मन सैन्याने वापरल्याचे लक्षात आले. त्याने आपल्या लेखणीच्या माध्यमातून वारंवार याविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली. मात्र, त्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्यानंतर पुन्हा एकदा 1982 (फेब्रुवारी) मध्ये झालेल्या वायुगळतीत 24 कामगारांना बाधा झाली. पुन्हा एकदा ऑक्टोबर महिन्यात मिथेल आयसोसायनेट, हायड्रोक्लोरिक आम्ल आणि क्लोरोफॉर्म गळतीने तीनजणांचा बळी गेला.  विशेष म्हणजे त्याच दरम्यान या कारखान्याला मध्य प्रदेश सरकारने औद्योगिक सुरक्षिततेचा पुरस्कारही दिला होता. (ही गोष्ट आपल्यासाठी नवीन नाही. पर्यावरणास घातक ठरणारे असे अनेक कारखाने पर्यावरण स्नेहीचा टॅग मिरवताना दिसतात.)

 

दुसरे म्हणजे, युनियन कार्बाइडच्या प्रकल्पाशेजारील वसाहतींना जे पाणी मिळते त्यात कार्बन टेट्रॅक्लोराइड आढळले होते. या पाण्याचे नमुने दिल्लीतल्या एका प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असताना हे पाणी पिण्यायोग्य असल्याचे जाहीर करण्यात आले होते.  शिवाय स्वित्झर्लंडलडमधल्या प्रयोगशाळेने व सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हार्यमेंटनेही या पाण्यात मोठय़ा प्रमाणावर रासायनिक द्रव्ये असल्याचे सांगितले होते. वायुगळतीनंतर कंपनीच्या जागेत व परिसरात अठरा हजार टन रसायने जमिनीत पुरली होती. परिणामी, इथल्या नागरिकांना विषारी पाणीच प्यावे लागते. त्यामुळे आजही इथल्या लोकांना फुप्फुस, आतडय़ांचे विकार, छातीचा कर्करोग, कर्णबधिरता, खोकला, शरीरावर नीळसर काळे चट्टे येणे अशा कित्येक व्याधींना सामोरे जावे लागते.

 

या दुर्घटनेतील घातक घनकच-याची विल्हेवाट हा त्यानंतर कळीचा मुद्दा ठरला. डिसेंबरमध्ये नागपूरवर येणारे घातक घनक-याचे सावट आता नवी मुंबईवर येऊ घातले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांसह चर्चा न करताच हा कचरा तळोज्यात एमआयडीसीतल्या मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीत जाळण्याच्या सूचना केल्या. या कच-यात हॅलोजनेटेड कंपाउंड्स, क्लोरिनेटेड, ऑरगॅनिक चेन अशा रसायनांचा समावेश असल्याने हा कचरा जाळल्यानंतर डायऑक्सिन हा विषायी वायू तयार होणार आहे. हा वायूही आरोग्यासाठी घातक आहे. या वायूमुळे कर्करोग, मेंदूचे तसेच चेतासंस्थेचे विकार जडण्याची शक्यता आहे. पण पुढच्या पिढीलाही शारीरिक व्यंगांना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागपूर आणि त्यापूर्वी गुजरातमधील जनतेने व पर्यावरणप्रेमींनी या विरोधात तीव्र आक्षेप घेतला होता. याला राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा व नवी मुंबईतील रहिवासी, विविध सामाजिक संस्था, पर्यावरणस्नेही संस्थांचाही विरोध आहे.

 

या विरोधामुळे कदाचित नवी मुंबईतूनही या कचऱ्याची उचलबांगडी केली जाईल. पुन्हा दुस-याच कोणत्या राज्याच्या माथी हा कचरा मारला जाणार. तिथेही असाच विरोध दर्शवला जाईल. पण पुढे काय, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. अशा घातक कच-याची जिथल्या तिथेच विल्हेवाट लावण्यासाठी आणि परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये याकरता आपल्याकडे 28 वर्षानंतरही कोणतीच उपाययोजना नाही. 

 

आपल्याला शहाणपण सुचेल का?

 

आपल्याकडे आजही अनेक कारखान्यांची कसून तपासणी न करता त्यांना सुरक्षिततेची प्रमाणपत्र दिली जातात. कारखान्यांचा कारभार पर्यावरणस्नेही व्हावा, यासाठी त्यांना काही महिन्यांची मुदत दिली जाते आणि पुन्हा कोणतेही बदल न करता कारखाना पूर्ववत सुरू होतो. आजही राजरोस कंपन्यांमधील रासायनिक द्रव्ये गटारांमध्ये, तलावात, नद्यांमध्ये सोडली जातात. चेंबूर परिसर हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. गेल्याच वर्षी इथल्या आशिष तलावात शेकडो मृत मासे आढळून आले होते. रसायनांच्या वासामुळे या परिसरातील रहिवाशांना कायम नाकावर रुमाल धरावा लागतो. नवी मुंबईमधील कळंबोलीतून वाहणा-या नदीतही अनेकदा मृत मासे तरंगताना दिसतात. मात्र, अशा ठिकाणच्या नागरिकांच्या आरोग्याबाबत सरकार सदैव ढिम्मच असते.

Marathi Online News

शेअर: Facebook this story Facebook Twitter Google this story Google My Space this storyMySpace  Google+

प्रतिक्रियां (0 पोस्टेड ):

तुमची प्रतिक्रिया पोस्ट करा comment

आपण मराठीतूनही प्रतिक्रिया लिहू शकता. त्यासाठी प्रथम Ctrl+g दाबा. त्यानंतर लिहावयाच्या मराठी शब्दाचे स्पेलिंग रोमन इंग्रजीत लिहा व Space bar दाबा. तुम्ही लिहिलेला शब्द मराठीत दिसू लागेल. उदाहरणार्थ, prahaar असे टाइप करून Space bar दाबल्यास `प्रहार’ असे उमटेल. पुन्हा इंग्रजीत लिहावयाचे असेल तर Ctrl+g दाबून हवा तो मजकूर टाइप

कृपया या इमेज मधून कोड एंटर करा

  • email मित्रांना ईमेल करा
  • print छापील मजकुर
  • Plain text प्रिंट
मोस्ट कमेंटेड
या बातमीचे गुणांकन करा
0