Marathi Online News | Marathi Latest News | Marathi News | Breaking Online News: प्रहार ब्लॉग म्हाडा सक्षम नाही म्हणजेच.. ================================================================================ सचिन धानजी on 05 September, 2010 11:10:00 AM खासगी विकासक मोठं घर देईल आणि पैसाही देईल. पण म्हाडा काय देणार, त्यामुळं भाडेकरूंचा म्हाडाला विरोध होतोय. मात्र जे अर्थकारण भाडेकरूंचे आहे तेच अर्थकारण सध्या मुख्यमंत्री आणि गृहनिर्माण खात्याचं आहे, हे दिसून आलं आहे. म्हाडामार्फत बीडीडी चाळींचा विकास केल्यास मोठं घर सोडा, इतर मिळणा-या आर्थिक मदतीवरही पाणी सोडावं लागेल ही भीती जशी भाडेकरूंची आहे, तीच भीती सरकारमधील मंत्र्यांची आहे. त्यामुळे म्हाडाकडे जबाबदारी सोपवून खासगी विकासकांकडून मिळणा-या ‘अर्थदाना’वर पाणी सोडण्याची इच्छा कोणाचीही नसेल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मनात जे होतं तेच त्यांच्या ओठातून बाहेर पडलं. ग्राहकांची सुरक्षितता ================================================================================ वसुंधरा देवधर on 05 September, 2010 09:15:00 AM धान्याला लागलेली कीड प्रत्यक्ष दिसते आहे, त्या विषयीचे उपाय करण्यास वाव असेल तर उपाय होईल, अन्यथा ते धान्य ‘वाया गेले’ असेच म्हणावे लागेल, पण शैक्षणिक वर्ष, विद्यार्थ्यांचा उत्साह, पालकांचा कष्टार्जित पैसा ‘वाया गेला’ असे होऊ देता कामा नये. विकास प्राधिकरणांच्या मनमानीला चाप ================================================================================ वसुंधरा देवधर on 29 August, 2010 08:05:00 AM मोठ्या शहरांत जागा घेणे सर्वसामान्य नाकारिकांना फार कठीण असते. वाढत्या शहरीकरणाची सुनियोजित आखणी करण्यासाठी‘विकास प्राधिकरणां’ची स्थापना करण्यात येते. या प्राधिकरणांद्वारे ज्याप्रमाणे परिसर नियोजन व विकास केला जातो, त्याचप्रमाणे विविध उत्पन्न गटांसाठी घरकुलेसुद्धा बांधण्यात येतात. मुंबई शहरासाठी अशा प्रकारची घरकुले, घरे, इमारतींमधील सदनिका यांच्या जाहिराती येतात, त्या वेळी प्रचंड प्रमाणात अर्ज केले जातात, सोडत निघते, हे सर्व आपणास माहीतच आहे. आयुक्तांनी जोखले महापालिकेचे पाणी! ================================================================================ सचिन धानजी on 29 August, 2010 07:55:00 AM मुंबईकरांवरील लागू केलेली पाणीकपात मागे घेण्यावरून महापालिकेत रणकंदन माजले असताना आजवर स्थायी समितीला न जुमानणा-या महापालिका आयुक्तांना एक महिन्यासाठी का होईना पाणीकपात शंभर टक्के मागे घेण्याची सुबुद्धी झाली. विभाजनाचे राजकारण ================================================================================ सचिन धानजी on 22 August, 2010 09:15:00 AM मुंबई महापालिकेचे विभाजन करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, तसे विभाजन करण्याचा कोणताही विचार सरकारचा नाही, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. तरीही मुंबईही आमचीच. त्याच्या विकासाची चिंता आम्हालाच, असा जो काही आव आणून शिवसेना मुंबईच्या मुद्दयावरून रान उठवतेय यामागे विकासाची चिंता किती व राजकारण किती याचा अंदाज आल्यावाचून राहत नाही. मुंबई महापालिकेचे विभाजन होऊ नये, अशीच लोकभावना आहे. परंतु महापालिकेत गेली 15 वर्षे शिवसेना-भाजप युतीची सत्ता आहे. या पंधरा वर्षात मुंबईच्या किती विकासकामांना युतीने गती दिलीय? डॉक्टर आणि जाहिराती ================================================================================ वसुंधरा देवधर on 22 August, 2010 08:45:00 AM रोग्यांना आपल्याकडे, आपल्या गटाकडे अगर संस्थेकडे आकृष्ट करणे, कोणत्याही प्रकारच्या माध्यमातून जाहिरात करणे, त्यात वैयक्तिक माहिती, वैशिष्ट्ये, कौशल्ये इ. चे वर्णन करणे. या व यासारख्या इतर अनेक गोष्टींना मज्जाव करण्यात आला आहे. दवाखान्यात अगर दवाखान्याबाहेरच्या बोर्डावर डॉक्टर स्वत:चा फोटो लावू शकत नाही, असेही त्या नियमात म्हटले आहे. एक छोटी सुरुवात मोठय़ा बदलाची.. ================================================================================ वसुंधरा देवधर on 15 August, 2010 11:25:00 AM ही घटना आपल्याला जे शिकवून गेली आहे, ते मनात जपायचंय. त्यामुळे आपलं सर्व ग्राहकांचं बळ कशात आहे, ते ध्यानात राहील. मग ‘जादा रुपया’ मागण्याचा दूधवाल्यापासून-शीतपेयाच्या दुकानदारार्पयन सर्वाना‘नाही’म्हणण्याचे बळ आपणास मिळेल. मल्टिप्लेक्सपासून एस.टी. स्टॅँडपर्यंत एम.आर.पी. पेक्षा जास्त किंमत देण्यास‘नकार’देण्याचे सामर्थ्य आमच्यात आहे. जरूर आहे ते जाणण्याची, व्यक्त करण्याची. 12 ऑगस्टच्या‘रिक्षा-टॅक्सीला केवळ एक दिवस नाही’म्हणू शकण्याच्या या आंदोलनाची परिणती, विविध क्षेत्रांकडून विविध पातळय़ांवर ग्राहकांना ज्या ज्या अन्यायाला सामोरे जावे लागते, त्याच्या निवारणात होऊ शकते हाच गर्भित संदेश, ग्राहकांसाठी दिलासादायक आहे. कंत्राटदारांमुळे महापालिका खड्डयात ================================================================================ सचिन धानजी on 15 August, 2010 11:20:00 AM मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांवर कोट्यवधी रुपयांची मलमपट्टी केली जात आहे. सुरुवातीला 40 कोटी रुपयांच्या असलेल्या निधीमध्ये आणखी 20 कोटी रुपयांची वाढ करून दिली आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या खड्डयांची चर्चा सध्या मुंबईसह सर्वत्रच जोरदार सुरू आहे. पुन्हा एकदा, विमा कंपनी! ================================================================================ वसुंधरा देवधर on 08 August, 2010 08:15:00 AM शर्मा पती-पत्नी साईबाबा मंदिरात दर्शनासाठी गेले होते. घरातून निघताना सौ. शर्मा यांनी दागिन्यांचा एक सेट व आठ बांगड्या परिधान केल्या. प्रवीण शर्मा यांच्या गळ्यात पदकवाली एक चेन, हातात एक कडे आणि बोटात दोन अंगठय़ा होत्या. मंदिराकडे आल्यावर त्या पती-पत्नीला वाटले की, हे सारे दागिने मिरवीत दर्शनाला जाऊ नये, म्हणून मोटारीतच त्यांनी हे दागिने उतरवले, ते एका लहानशा बटव्यात घातले, बटवा हँडबॅगेत ठेवला आणि ती हँडबॅग मोटारीच्या डॅश बोर्डाखालील कप्प्यात ठेवली. मग मोटार नीट बंद करून, किल्ल्या घेऊन उभयता दर्शनासाठी साईबाबा मंदिरात गेले. साधारण वीसेक मिनिटांनी दोघे दर्शन करून परतले, तर काय.. मोटारीच्या डाव्या बाजूचा दरवाजा उघडा आणि कप्प्यातील हँडबॅग गायब! निष्क्रिय सत्ताधारी, आक्रमक विरोधक ================================================================================ सचिन धानजी on 08 August, 2010 08:10:00 AM मुंबई महापालिकेत सत्तेवर असलेली शिवसेना-भाजप युतीची निष्क्रियता दिवसेंदिवस ठळकपणे जाणवू लागली आहे. मुंबईच्या विकासात युतीच्या नेत्यांनी योगदानही देता आलेले नाही. शिवाय मलेरियाच्या साथीवर त्यांना नियंत्रणही ठेवता आलेले नाही. प्रत्येक बाबीमध्ये शिवसेनेला अपयशच येत आहे. आपणच नियुक्त केलेले नेते प्रशासनाच्या ताटाखालची मांजरे बनल्याने खुद्द शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांना रस्त्यावर उतरून महापालिकेच्या कामकाजात लक्ष द्यावं लागतंय.