21 August, 2011 12:05:00 PM
यावर्षी पाच ऑगस्ट या तारखेपासून देशभरामध्ये ‘अन्न सुरक्षा व मानके कायदा’ (2006) अमलात आला आहे. या कायद्यामध्ये अन्नसंबंधी कोणताही व्यवसाय अगर व्यवहार करणारे सर्व मोठे आणि अगदी लहान उद्योग, व्यावसायिक आणि व्यक्ती यांना ‘फूड बिझनेस ऑपरेटर’ असे म्हटले आहे.
17 August, 2011 03:20:00 AM
मलबार हिलमधील डुंगरशी रोडवर ‘शिवम्’ इमारत आहे. त्यात प्रतिभाबेन ठक्कर या आपल्या मुलासह राहतात. त्यांच्या पतीचं काही वर्षापूर्वी निधन झालं. मुलगा एका खासगी कंपनीत कामाला आहे. त्याचं अद्याप लग्नही झालं नव्हतं. आठवडापूर्वी दुपारच्या सुमारास मुलगा कामाला गेला असतानाच, एक तरुण घरात घुसला. त्यानं हातोडय़ानं प्रतिभाबेन यांच्या डोक्यावर, चेह-यावर हल्ला केला. त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला. ठक्कर यांच्या जाऊबाई त्याच सुमारास घरी आल्या. त्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी शोधा-शोध सुरू केली. ...
16 August, 2011 01:30:00 AM
माथाडी कामगारांच्या सुरक्षेसाठी बोर्ड तयार झाले तरी, कामगार व व्यावसायिकांची वेगवेगळय़ा बोर्डाकडे असलेल्या नोंदी, बोर्डातील अधिकारी व कामगारांची रिक्तपदे यामुळे आजही लाखो माथाडी कामगार कायद्यानुसार मिळणा-या सुविधांपासून वंचित आहेत....
15 August, 2011 04:30:00 AM
महिलांना 50 टक्के आरक्षण जाहीर झाल्यामुळे या निर्णयाचं स्वागतच होत आहे. परंतु विद्यमान नगरसेविकांवर नजर टाकली तर अधिक तर मौनीच होत्या. महिलांसाठी वॉर्ड राखीव झाला म्हणून महिलांना उमेदवारी दिली जाते आणि त्या निवडून आल्यावर त्या नगरसेविकांऐवजी त्यांचे पतीच नगरसेवक म्हणून बाहेर आणि महापालिकेत मिरवत असतात. त्यामुळे महिलांना उमेदवारी मिळाली म्हणून पुरुषांचं नुकसान होत नाही. उलट पुरुषांना उमेदवारी मिळून ते नगरसेवक झाल्यास त्यांची बायको नगरसेविका म्हणून मिरवत नाही. त्यामुळे महिला निवडून येण्यातही पुरुषांचाच अधिक फायदा असतो....
14 August, 2011 12:15:00 PM
‘ग्राहक’ म्हणून आपली ताकद काय आहे, याची जाणीव आणि त्या ताकदीचे प्रगटीकरण हा आपल्या स्वातंत्र्यलढय़ाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. खरेदी करण्याचा जसा हक्क आहे, तसाच बाजारातील उपलब्ध वस्तू अगर सेवा नाकारण्याचाही हक्क ग्राहकाला आहे. असा हक्क ज्यावेळी मोठय़ा प्रमाणावर बजावला जातो, त्यावेळी उत्पादक, पुरवठादार इ. सर्वाना येग्य मार्गावर ठेवण्यास त्याचा उपयोग होतो. तो केव्हा, कुठे, कसा आणि का वापरायचा हे त्या त्या वेळच्या एकूण परिस्थितीवर, समाजाच्या मानसिकतेवर आणि नेतृत्वावरही अवलंबून असते....
10 August, 2011 03:30:00 AM
मुलांच्या करिअरसाठी 20-25 लाख रुपये शिक्षणसंस्थेच्या चरणी ओतताना घरची मंडळी मागेपुढे पाहत नाहीत. शिक्षणसंस्था विद्यार्थ्यांना लुटतात शिवाय, सरकारकडून सवलतीही फुकटात पदरात पाडून घेण्याचा त्यांचा अट्टहास असतो. पिंपरी-चिंचवडमधील श्रीराम पांडे यांनी अशाच एका प्रकरणाचा पोलखोल केला.
...
09 August, 2011 04:25:00 AM
मुलगी का नको? तर प्रगत समाजामध्ये मालमत्तेसाठी वारस म्हणून मुलगाच हवा, असा आग्रह धरला जातो. गरिबांच्या घरीसुद्धा मुलगाच हवा असा आग्रह दिसतो, परंतु त्याची कारणे वेगळी असतात. मुलीच्या जबाबदारीचे ओझे वाटल्यामुळे गरिबांना मुलगी नको असते. प्रगत समाजाबाबत त्यांचे प्रबोधन करणे एवढाच मार्ग असतो, परंतु गरिबांच्याबाबतीत केवळ प्रबोधन उपयोगाचे ठरत नाही. मुलीच्या जन्माचे ओझे वाटू नये, यासाठी काही करण्याची गरज होती. त्याचा विचार करून काही उपक्रम आकाराला आले....
08 August, 2011 05:30:00 AM
इको फ्रेंडली गणेशमूर्तीसाठी मूर्तिकारांच्या होणा-या कार्यशाळा, जनजागृतीसाठी सेलिब्रिटीजना हाताशी धरून काढल्या जाणा-या मिरवणुका आणि दरवर्षी निघणारे सरकारी अध्यादेश वा मार्गदर्शक सूचना.. दरवर्षी हमखास दिसणारं हे चित्र. ...
07 August, 2011 10:45:00 AM
महागाई वाढत जाऊन हातातला पैसा कमी पडू लागला की सामान्य ग्राहकाला अगदी अगतिक झाल्यासारखे होते. ‘काय करू, कुठे जाऊ’ असे प्रश्न पडू लागतात....
03 August, 2011 04:30:00 AM
संपूर्ण पोलिस यंत्रणा स्फोटांतील आरोपींच्या मागावर असतानाच या घटना घडल्या. त्यामुळे पोलिसांचीही दाणादाण उडाली. आधीच गुप्तचर संस्थेच्या इशा-यामुळे पोलिसांच्या सुट्टय़ा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यात पावसाळी अधिवेशन असल्यामुळे नाकाबंदीसह अन्य बंदोबस्त आणि सतर्कता बाळगण्याचीही जबाबदारी पोलिसांच्याच खांद्यावर. तरीही, अतिशय चलाखीने मरोळमध्ये करण्यात आलेल्या दुहेरी हत्येचं गूढ उकलण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दहा च्या पोलिसांना यश मिळालं.
...