PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: प्रहार ब्लॉग निवृत्तीपश्चात सेवांनाही ग्राहक संरक्षण ================================================================================ वसुंदरा देवधर on 30 April, 2012 12:50:00 PM ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत ‘ग्राहक’ म्हणून कोण तक्रार करू शकतो आणि कोण ‘ग्राहक’ ठरत नाही, म्हणून संबंधित कायद्यान्वये आपली समस्या सोडवून घेऊ शकत नाही, याबाबत अनेक वेळा चर्चा होते. याचे कारण असे की एखादी समस्याग्रस्त व्यक्ती ‘ग्राहक नाही’, अशी भूमिका घेतली की मुळात त्या व्यक्तीस, म्हणजेच तक्रारदारास आपण ‘ग्राहक कसे ठरतो’ हे आधी स्पष्ट करावे लागते. त्यामध्ये काही काळ, शक्ती खर्च होतेच. मात्र विविध प्रकरणांसंदर्भात ग्राहक न्यायालयाने (नॅशनल कमिशन) आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेले महत्त्वाचे निर्णय जर आपणास माहीत असतील, तर त्यायोगे ग्राहकाच्या व्याख्येत कोण, कसे बसतात, हे ध्यानात येईल. तिकिटावरून मारेक-याचा माग ================================================================================ मंगेश सौंदाळकर on 25 April, 2012 04:30:00 AM इब्राहिमच्या खोलीत त्यांचे नातेवाईकही राहात. हत्येपूर्वी इब्राहिम यांच्या घरी एक तरुण आला होता. मात्र हत्येनंतर तो दिसेनासा झाल्याचे शेजा-यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. शेजा-यांनाही त्या तरुणाबाबत फारशी माहिती नव्हती. परिचर महिलांच्या श्रमाला मोल नाही ================================================================================ संजय जाधव on 24 April, 2012 05:45:00 AM राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण भागात आरोग्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर काम करणा-या अंशकालीन महिला कर्मचा-यांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे त्यांना वाढत्या महागाईत कुटुंब चालवणे कठीण झाले आहे. सवलत योजनांचा भुलभुलय्या ================================================================================ वसुंधरा देवधर on 23 April, 2012 09:30:00 AM कर्ज योजनेपासून प्रवासी विमान कंपन्यांपर्यंत सर्वच जण कोणत्या ना कोणत्या सवलत योजना जाहीर करून ग्राहकाला आमिष दाखवत असतात. सवलतींचा लाभ मिळावा, यासाठी ग्राहक अशा सवलतींबाबत असलेल्या अटी न वाचता खरेदी करतो आणि सवलतींच्या भुलभुलय्यांना बळी पडतो. त्यामुळे अशा योजनांमागील स्पष्टता ग्राहकांनी वेळीच समजून घेणे आवश्यक आहे. माहिती अधिकाराची ‘नाकाबंदी’ ================================================================================ रामराजे शिंदे on 18 April, 2012 05:30:00 AM केंद्रात माहितीच्या अधिकारामुळे काम वाढल्याचे कारण पुढे करून यातून सीबीआयला वगळण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. तर महाराष्ट्रात कायद्यालाच मर्यादा घालण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले आहेत. महाराष्ट्राच्या तुलनेत बिहार हे मागास राज्य. पण माहितीचा अधिकार कायद्याची अमलबजावणी करण्यासाठी आणि कामात पारदर्शकता आणण्यासाठी बिहारने सुरू केलेल्या कामाला तोड नाही. समाजाची मानसिकता बदलतेय.. ================================================================================ अमिता बडे on 17 April, 2012 06:25:00 AM माया, वात्सल्य हे शब्द अर्थहीन वाटायला लावणा-या प्रत्यक्ष जन्मदात्यांच्या क्रौर्याचे दर्शन घडवणा-या दोन घटना गेल्या पंधरवड्यात घडल्या. एक घटना बेंगळूरुची बेबी आफरीनची, तर दुसरी मध्य प्रदेशातील भोपाळमधील दोन दिवसांच्या दुर्दैवी मुलीची.. मुलगा म्हणजे वंशाला दिवा हवा म्हणून क्रूर पद्धतीने आपल्या पोटच्या लेकींसाठी हे दोन्ही जन्मतदाते क्रूरकर्मा ठरले. विमान प्रवास नियम लक्षात घ्या ================================================================================ वसुंधरा देवधर on 16 April, 2012 04:45:00 AM मे-जून महिना प्रवासाचा असतो. शिवाय विविध कारणांसाठी वर्षभर प्रवास होत राहतात. प्रवासी कंपनीवर सर्व जबाबदा-या सोपवून आपण निर्धास्तपणे मौजमजा करू शकतो. मात्र, त्यासाठी चार पैसे जास्त मोजायची तयारी ठेवावी लागते. याला पर्याय म्हणून आपली सहल आपणच आयोजित करण्यामध्ये एक वेगळा आनंद असतो. मोबाइलवरून आरोपी पकडला ================================================================================ मंगेश सौंदाळकर on 12 April, 2012 05:30:00 AM चोरीच्या घटनेनंतर कालूने काही काळ मोबाइल क्रमांक बदलला होता. नवीन मोबाइलही तो नेहमी बंद ठेवत असे. मोबाइल बंद ठेवत असल्याने त्याला शोधणे फार कठीण झाले होते. अखेर टीमने झियागंद येथील स्थानिय पोलिसांना विश्वसात घेतले. तपासात अडथळे येऊ नयेत, म्हणून खबरदारी घेण्यात आली. कर्मचा-यांचा संघर्ष सुरूच ================================================================================ संजय जाधव on 10 April, 2012 05:40:00 AM ठाण्यातील ‘अ‍ॅपलॅब’ या कंपनीतील कामगारांचे गेल्या दीड महिन्यापासून व्यवस्थापनाविरोधात आंदोलन सुरू आहे. वागळे इस्टेट येथे असलेली ही कंपनी 50 वर्षे जुनी आहे. कंपनीची वर्षाची उलाढाल 115 कोटी रुपये असताना कामगारांचे प्रश्न मात्र अद्याप सुटलेले नाहीत. विमा एजंट हवा विश्वासार्ह ================================================================================ वसुंधरा देवधर on 09 April, 2012 05:15:00 AM भविष्यात येणा-या आपत्तींमुळे मोठा आर्थिक बोजा पडू नये, त्याचबरोबर अकाली मृत्यूमुळे कुटुंबाला आर्थिक ताण सहन करावा लागू नये, यासाठी विमा संरक्षणाची तरतूद केली जाते. पण, जर विमा एजंटच विश्वासार्ह नसेल तर आपली फसवणूक होऊ शकते आणि आयुष्यातील अतिशय महत्त्वाची असलेली ही गुंतवणूक वाया जाऊ शकते, हे लक्षात घेऊन ग्राहकांनी याबाबतीत सावधगिरी बाळगणे आणि विमा एजंटकडून भरल्या जाणा-या हप्त्यांची वेळोवेळी शहानिशा करणे गरजेचे आहे.