PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: प्रहार ब्लॉग बेरोजगारीची टांगती तलवार ================================================================================ संजय जाधव on 13 March, 2012 05:20:00 AM कंपनी तोट्यात आहे, असे दाखवत कंपन्यांना टाळे लावण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. वर्षानुवर्षे काम करणा-या कामगारांच्या भविष्याचा विचार न करता रोजीरोटी हिरावून घेऊन त्यांना वा-यावर सोडले जाते. फक्त एकच दिवस का? ================================================================================ अमिता बडे on 06 March, 2012 06:35:00 AM गेल्या काही शतकांतील स्त्रियांपेक्षा आजची स्त्री नक्कीच अधिक मोकळा श्वास घेते. तरीही ही परिस्थिती आजही सापेक्ष आहे, हे विसरून कसं चालेल? तिला मोकळा श्वास घेता यावा, यासाठी झगडलेल्या सुधारकांच्या मेहनतीला आज ब-यापैकी फळ आलंय. तरीही बरंच काही साध्य होणं बाकी आहे. पाठवलेल्या मालासह ट्रक गायब होतात तेव्हा.. ================================================================================ वसुंधरा देवधर on 05 March, 2012 05:30:00 AM अनेकदा पावतीवर लिहिलेले असते, ‘हा माल, त्याच्या मालकाने त्याच्या स्वत:च्या जबाबदारीवर पाठवला आहे’ किंवा अशा अर्थाचा मजकूर असतो (ओनर्स रिस्क). या मुद्दय़ावर सर्वोच्च न्यायालयानेच नमूद करून ठेवले आहे की, पावतीवर अशा प्रकारची अट/नियम छापून, ट्रान्सपोर्ट कंपनी स्वत:ची जबाबदारी टाळू शकत नाही. अशा नियमावर बोट ठेवून पळवाट शोधू शकत नाही. निसर्ग, आरोग्याची ‘होळी’ सुरूच ================================================================================ अर्चना राणे on 05 March, 2012 06:30:00 AM होळी व रंगपंचमीनिमित्त यंदाही काही पर्यावरणप्रेमी संस्थांनी आणि राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने हरित सेनेच्या माध्यमातून निसर्गास पूरक सण साजरे करण्याचे आवाहन केले. पण दरवर्षीप्रमाणेच बुधवारीही त्याकडे दुर्लक्ष करून उंचच उंच होळ्या जाळल्या जातील. रासायनिक रंग एकमेकांच्या तोंडाला फासत, एकमेकांच्या अंगावर अंडी फोडत, गच्ची, बाल्कनीतून फुग्यांचा, प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा अविरत मारा करत, पाण्याचा अपव्यय करत, नाल्या-गटारात लोळत रंगपंचमीही साजरी केली जाईल आणि दुस-या दिवशी ‘हँगओव्हर’ होळी-पंचमीच्या गप्पाही चांगल्याच ‘चढतील’. त्यावेळी चुकून तरी आपल्या लक्षात येईल का, पूर्वापार जपत आलेलं होळी आणि रंगपंचमीचं पावित्र्य ते हे नव्हेच! पोलिसांतला ‘सिंघम’ ================================================================================ रामराजे शिंदे on 29 February, 2012 05:30:00 AM एकीकडे गुन्हेगारी थोपवणं तर दुसरीकडे कायदा व सुव्यवस्था राखणं, ही तारेवरची कसरत आजपर्यंत पार पाडण्यात अरुप पटनाईकांना यश मिळालं. त्याला दोन्ही विभागाच्या अधिका-यांची साथ मिळाली. नवरात्र, गणेशोत्सवात घातपात होऊ न देण्याचं श्रेयही त्यांनाच जातं. बूटपॉलिश कामगारवर्गाकडे दुर्लक्षच ================================================================================ संजय जाधव on 28 February, 2012 02:05:00 AM 1964 पासून मुंबई शहरात रेल्वेफलाटावर ठेकेदारी पद्धतीने बूटपॉलिश करणा-यांचा व्यवसाय सुरू झाला. मात्र, इतकी वर्षे कार्यरत असलेल्या या बूटपॉलिश कामगारांना रेल्वेने ठेकेदारीतून अद्यापि मुक्त केलेले नाही. तर मराठी भाषेला चांगले दिवस येतील ================================================================================ राजेश सावंत on 27 February, 2012 03:54:00 PM प्रत्येक प्रकारचा व्यवहार मराठीतून आग्रहाने करत राहिलो तर आपल्या भाषेला नक्कीच चांगले दिवस येतील. पण त्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने पुढाकार घ्यायला हवा. वैयक्तिक जमिनीवरचे अतिक्रमण ================================================================================ वसुंधरा देवधर on 27 February, 2012 04:40:00 AM विकास प्राधिकरणांच्या माध्यमातून नगरांचा विकास करताना, शहरांच्या हद्दी मोठ्या करताना, आसपासची खेडी, वस्त्या व तिथे अगोदरपासून राहणारे नागरिक यांचा विचार केला जातो. या प्राधिकरणांनी उपलब्ध करून दिलेले भूखंड खरेदी करताना ते मोजून घेण्याची व खरेदी केलेल्या भूखंडाचे संरक्षण करण्याची जबाबदारी ग्राहकाची असते. तसे न झाल्यास पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ शकते. माहिती अधिकाराला हवी नवसंजीवनी ================================================================================ रामराजे शिंदे on 22 February, 2012 05:30:00 AM माहिती अधिकार कायदा होण्यासाठी पुढाकार घेणा-या महाराष्ट्र राज्यातच माहिती अधिकार कायद्याचीच गळचेपी होत असून आयएएस आणि नॉन-आयएएस अधिका-यांतील वैर दूर झाल्यास तसेच मुख्यमंत्र्यांनी गंभीरपणे विचार करून कृती करण्यावर भर दिल्यास या कायद्याला उभारी मिळू शकेल. अवतरले महिलाराज ================================================================================ अमिता बडे on 21 February, 2012 05:50:00 AM मुंबई महापालिकेत 227 सदस्य आहेत. पन्नास टक्के आरक्षणानुसार महिलांना 113 जागा मिळायला हव्यात, परंतु प्रत्यक्षात 121 महिला निवडून आल्या आहेत, त्यामुळे पुरुषांची संख्या 105 पर्यंत घसरली आहे. मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने महिला निवडून आल्या असून यातील निम्म्याहून अधिक महिला पहिल्यांदाच निवडून आल्या आहेत.