PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: प्रहार ब्लॉग मोटारवाहन अपघात आणि नुकसानभरपाई ================================================================================ वसुंधरा देवधर on 20 February, 2012 02:00:00 AM वर्तमानपत्र उघडल्यावर रस्त्यावरील अपघातांच्या बातम्या रोजच वाचता येतात. कुणी जखमी तर कुणी देवाघरी गेले, अशा प्रकारच्या बातम्या सुन्न करतात. जंगलांच्या जोडीदारांची ससेहोलपट ================================================================================ अर्चना राणे on 20 February, 2012 05:05:00 AM देशातील जंगलक्षेत्रात 367 चौरस किमीची घट झाल्याचे केंद्रीय वनखात्याच्या सर्वेक्षणातून नुकतेच जाहीर करण्यात आले. जवळपास आठ कोटी चौरस हेक्टर जंगलक्षेत्रात झालेली ही घट तशी किरकोळ वाटू शकते. वर्गणीसाठी येऊन मॉर्फिग ================================================================================ रामराजे शिंदे on 15 February, 2012 05:30:00 AM ईर्ष्येतून, वादातून, प्रेमभंगातून एकमेकांच्या छायाचित्रांचे मॉर्फिग करून अपलोड केले जाते. ते कोणी अपलोड केले, याचा शोध लागेपर्यंत छायाचित्रातील व्यक्तीची पुरती बदनामी झालेली असते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी अद्यापि कोणताच पर्याय सापडलेला नाही. गँगमनची परवड कायम ================================================================================ संजय जाधव on 14 February, 2012 05:30:00 AM रेल्वे रुळांवर जिवावरचा धोका पत्करून काम करणा-या गँगमन व अन्य कामगारांना कंत्राटदार सुरक्षेच्या दृष्टीने आजही आवश्यक सुविधा पुरवताना दिसत नाहीत. त्यांना रेल्वे रुळातच रात्रंदिवस उन्हपावसात काम करावे लागते. मात्र, त्याची दखल घेतली जात नाही. कामाच्या ठिकाणी आवश्यक सुविधा मिळावी, यासाठी गेली अनेक वर्षे मागणी करणा-या या कामगारांकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. बेपर्वा नगरपालिकांना जबाबदार बनवा! ================================================================================ वसुंधरा देवधर on 13 February, 2012 07:30:00 AM नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे, ही स्थानिक स्वराज्य संस्थांची कामे असतात. मात्र, ही कामेही त्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना धडपणे करता येत नाहीत. नगर परिषद, नगरपालिकांनी न केलेल्या तसेच अर्धवट कामाची किंमत नागरिकांना भोगावी लागते. अशा कामांमुळे नागरिकांना त्रास झालाच तर त्या विरोधात न्यायालयात दाद मागता येते, हे नागरिकांनी लक्षात ठेवावे. ठेकेदार उमेदवार कसा बनतो? ================================================================================ रामराजे शिंदे on 08 February, 2012 05:45:00 AM निवडणुका आल्या की, नगरसेवक दारोदार फिरून मतांचा जोगवा मागताना दिसतात. पण पाच वर्षाच्या कालावधीत काय ‘उद्योग’ केले, याबद्दल माहिती उघड केली जात नाही. मुलींच्या शिक्षणमार्गातील अडसर ================================================================================ अमिता बडे on 06 February, 2012 05:30:00 AM शाळांमधील मुलींचा हा प्रश्न त्याचाच एक भाग. शाळांमधील स्वच्छतागृहं अत्यंत अस्वच्छ असल्यानं विद्यार्थी विशेषत: मुली तिथं जाणं शक्यतो टाळतात. त्यामुळं त्यांना पोटदुखी, किडनी स्टोन, युरीन इन्फेक्शनसारख्या त्रासांना सामोरं जावं लागतं. शाळांमधील मुली या पौगंडावस्थेतली असल्यानं मासिक पाळीच्या वेळेस स्वच्छतागृहात जाण्याची वेळ येत असल्यानं तर त्या शाळेत जाण्याचंच टाळतात. परिसंस्थाच धोक्यात ================================================================================ अर्चना राणे on 06 February, 2012 05:30:00 AM निसर्गाची संपूर्ण परिसंस्था असलेल्या पाणथळ जमिनींवर भराव टाकून त्यावर गृहनिर्माण संस्था आणि कॉपरेरेट उद्योग उभे राहात आहेत. काही पर्यावरणप्रेमी सोडता बाकी कुणालाच याचे काही सोयरसुतक नाही. पण नष्ट होणा-या पाणथळींबरोबरच आपण निसर्गाचा समतोलही नष्ट करतोय, याचे भान कधी येणार? बेलगाम जाहिराती, नुकसान ग्राहकांचे करिती! ================================================================================ वसुंधरा देवधर, मुंबई ग्राहक पंचायत on 05 February, 2012 10:55:00 AM जाहिरातदार आणि ग्राहक यांचे नाते कोणते? असा प्रश्न जर विचारला, तर उत्तर देण्यासाठी थोडा वेळ लागेल. शिवाय या प्रश्नाचे एक ठाम उत्तर मिळणे ही कठीण होईल. पण आता वेळ आली आहे, भुलवणा-या जाहिरातींपासून तमाम ग्राहक वर्गाचे रक्षण करण्याची. असे केवळ ग्राहक हितार्थ झटणा-या संस्थांनाच वाटत नसून साक्षात ‘उपभोक्त मामले’ (कंझ्युमर अफेअर्स) मंत्रालयाला सुद्धा हालचाल करावी असे वाटू लागले आहे. बॉम्बस्फोटाचा तपास राजकारणात अडकला ================================================================================ रामराजे शिंदे on 01 February, 2012 04:30:00 AM राजकारण हे केवळ राजकीय नेतेच करतात अशातला भाग नाही. पोलिस अधिकारीही चांगल्या प्रकारे ‘गेम’ करू शकतात, याचे हे ताजे आणि उत्तम उदाहरण. पण उच्चपदावरील जबाबदार व्यक्तीनेच तपास यंत्रणेतील भांडाफोड केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.