PRAHAAR | ONLINE MARATHI NEWS: प्रहार ब्लॉग कामगारांचा लढा सुरूच.. ================================================================================ संजय जाधव on 31 January, 2012 05:55:00 AM गिरणी कामगार वगळता सध्या शहरात अन्य कामगारांचे मोठ-मोठे मोर्चे दिसत नाही. स्फूर्तीने भरलेल्या कामगारांच्या घोषणा कानावर पडत नाही. पण आजही कामगार आपल्या न्याय हक्कांसाठी लढण्याचा प्रयत्न करत आहेत. संघटित होण्याची धडपड करत आहेत. मात्र, कामगार संघटनांकडून त्यांना बळ मिळत नाही. त्यामुळे कारखान्यात मालकांचे मनमानी धोरण सुरू आहे. अशा परिस्थितीतही अनेक कामगारांनी आपल्या हक्कांसाठीचा लढा सुरू ठेवला आहे. जबाबदारी जामीन राहणा-याची ================================================================================ वसुंधरा देवधर on 30 January, 2012 11:50:00 AM मार्च 1990 मध्ये आठ हजार रुपयांचे कर्ज रविकुमारने घेतले. ते 54 हप्त्यांमध्ये, द. म. 150 रुपये याप्रमाणे फेडायचे होते. 20 वर्षापूर्वी आठ हजार ही रक्कम ग्रामीण बँकेच्या खातेदारासाठी महत्त्वाची होती. ‘गोडसेने गांधींची हत्या का केली?’ ================================================================================ रामराजे शिंदे on 25 January, 2012 03:30:00 AM गोडसेने गांधींची हत्या का केली, याचे उत्तर त्या अधिका-याने काय द्यावे? अधिकारीही धुतल्या तांदळाचे आहेत, अशातला भाग नाही. पण काही अर्जदारही कमालीचे उचापती असल्याचे दिसून येते. उमलणा-या कळ्यांसाठी.. ================================================================================ अमिता बडे on 24 January, 2012 05:30:00 AM मुलींच्या भवितव्याचा विचार करताना तीन मुद्दय़ांच्या अनुषंगाने करावा लागतो. शिक्षण, आरोग्य आणि स्वावलंबन. एकूण जगण्याच्या प्रवाहात स्त्री-पुरुष असमानता नष्ट करण्यासाठी आणि स्त्रियांचा सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी या तीन बाबी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. उमलणा-या कळ्यांचे भवितव्य सुरक्षित आणि उज्जवल बनवण्यासाठी आज आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने या तीन बाबींच्या अनुषंगानेच पुढील पावले टाकावी लागतील.. तरुण ग्राहक आणि आर्थिक नियोजन ================================================================================ वसुंधरा देवधर,मुंबई ग्राहक पंचायत on 23 January, 2012 02:30:00 AM आपल्या देशाची एक मोठी जमेची बाजू म्हणजे युवा शक्ती. या युवक-युवतींना अर्थाजर्नाच्या विविध संधी उपलब्ध होत आहेत. घातक कच-याचा प्रश्न अनुत्तरित ================================================================================ अर्चना राणे on 23 January, 2012 05:30:00 AM भोपाळमधली युनियन कार्बाइड कंपनीतून झालेली वायुगळतीची दुर्घटना तुमच्या लक्षात असेलच. तीन डिसेंबर 1984 ला रात्री बाराच्या सुमारास वायुगळतीला सुरुवात झाली आणि सकाळपर्यंत तीन हजारांवर माणसे मृत्युमुखी पडली. वाहनांचा काळाबाजार तेजीत ================================================================================ रामराजे शिंदे on 18 January, 2012 05:00:00 AM पोलिसांना आगोदर कायदा व सुव्यवस्था, गुन्हे अन्वेषण, आंदोलन तसेन ना-ना गोष्टींत हस्तक्षेप करावा लागतो. मात्र, वाहन चोरटय़ांच्या टोळींचा सुळसुळाट ही पोलिसांसमोरची डोकेदुखी ठरली आहे. मोठय़ा प्रमाणावर चोरीला जात असलेल्या गाडय़ा ही चिंतेची बाब असल्याचे पोलिस आयुक्त अरुप पटनाईक यांनीही गुन्हे विषयक परिषदेत कबूल केले. मालक तुपाशी, कामगार उपाशी ================================================================================ संजय जाधव on 17 January, 2012 04:00:00 AM ठाणे येथील वागळे इस्टेटमध्ये भागीदारीत चालणा-या डायनामिक क्रेन्स कंपनीत मालकांच्या वादामुळे मागील दोन वर्षापासून कंपनीचे काम बंद पडले आहे. आरोग्यावर संक्रांत! ================================================================================ वसुंधरा देवधर on 16 January, 2012 11:45:00 AM अन्न सुरक्षा (फूड सेफ्टी) प्राधिकरणाने स्वत:हून देशभरातील 28 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये दुधाचे नमुने गोळा केले. त्यांचे सरकारी व मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमध्ये शास्त्रीय कसोटय़ांवर परीक्षण केले. त्याचे जे निर्णय आले ते जनतेसाठी खुले केले. त्यामुळे या माहितीला अधिकृतपणा प्राप्त झाला आहे.यामध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली की, घेतलेल्या नमुन्यापैकी सर्वच नमुने मानकांमध्ये सांगितलेल्या कसोटय़ांना उतरले ते फक्त ‘गोवा’ आणि पुडुचेरीमध्ये. अजून एक ट्रेंड असा दिसतोय की, जस जसे दक्षिणेकडे यावे तशी भेसळ कमी होत आहे. उदा. जम्मू-काश्मीरमध्ये 83 टक्के नमुने भेसळयुक्त आढळले तर तामिळनाडूत 12 टक्के. अगदी वाईट परिस्थिती बंगालमध्ये आहे. तिथे 100 टक्के नमुने भेसळयुक्तच! अशी हवी अदालत.. ================================================================================ रामराजे शिंदे on 11 January, 2012 02:30:00 AM दोन-तीन वर्षापासून केवळ शिधापत्रिका मिळावी म्हणून लढणा-या अर्जदाराला जागेवरच सात दिवसांत शिधापत्रिका देण्याचे अधिका-यांनी कबूल केले.. रत्नागिरीच्या गावातील बंद पडलेली एसटी सुरू करण्यात यश मिळाले.